news
शिक्षण सुधारणा आणि बेरोजगारीला राष्ट्रीय मुद्दा बनवण्याचा संकल्प; मुख्य प्रवक्ते सौरव दास, प्रवक्ते आशुतोष रांका यांच्यासह कोअर टीमच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णयअभ्यागतांच्या तक्रारी व निवेदने प्रत्यक्ष ऐकून घेत स्थळपाहणी व तातडीने कार्यवाहीचे आदेश; दर गुरुवारी ४ ते ६ नागरिकांसाठी विशेष वेळ राखीवपक्षाची धोरणे जनतेपर्यंत पोहोचवणे आणि विरोधकांच्या अपप्रचाराला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी निष्ठावंत कार्यकर्त्याला मोठी संधीदिल्ली मेट्रो, नाशिक कुंभमेळा जलसुविधा प्रकल्पासह ऊर्जा आणि सौर क्षेत्रातील मोठ्या ऑर्डर्स प्राप्त; कंपनीची व्यवसायात सातत्यपूर्ण घोडदौडशहराच्या पाणीपुरवठ्याला बाधा न आणता प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवर संवेदनशीलतेने टप्प्याटप्प्याने कार्यवाही करण्याचे महापौरांचे आश्वासन
Home अकोला पोलीसच झाले लाचखोर! एएसआय कानडे अन् हवालदार रडके यांच्यावर ‘एसीबी’चा प्रहार; कारवाई टाळण्यासाठी हप्त्याची मागणी पडली महागात

पोलीसच झाले लाचखोर! एएसआय कानडे अन् हवालदार रडके यांच्यावर ‘एसीबी’चा प्रहार; कारवाई टाळण्यासाठी हप्त्याची मागणी पडली महागात

भ्रष्टाचाराचा विळखा: दारू व्यवसाय सुरळीत ठेवण्यासाठी लाचेची मागणी; अकोला एसीबीच्या (ACB) जाळ्यात दोन पोलीस कर्मचारी अडकले. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love


खाकी डागाळली! मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यातील एएसआयसह हवालदारावर गुन्हा; दारूचा धंदा सुरू ठेवण्यासाठी मागितली होती लाच


अकोला /मुर्तिजापुर प्रतिनिधी विलास सावळे, १४ मार्च २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

मूर्तिजापूर (अकोला) : दारूचा व्यवसाय सुरळीत सुरू ठेवण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) धडक कारवाई केली आहे. या कारवाईत सहायक पोलीस उपनिरीक्षक (ASI) आणि एका पोलीस हवालदारावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याने पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

तक्रारदाराचा दारूचा व्यवसाय विनासायास सुरू ठेवण्यासाठी आणि कारवाई टाळण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी पैशांची मागणी केली होती. तडजोडीअंती प्रत्येकी २,००० रुपये याप्रमाणे लाचेची मागणी करण्यात आली. यासंदर्भात तक्रारदाराने अकोला एसीबीकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली होती.

आरोपींची नावे:

१. दिपक गणपतराव कानडे (वय ५६, सहायक पोलीस उपनिरीक्षक)

२. ज्ञानेश्वर विठ्ठलराव रडके (वय ३८, पोलीस हवालदार)

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अकोला येथील पोलीस निरीक्षक अतुल गुणवंतराव इंगोले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ११ फेब्रुवारी २०२६ ते ११ मार्च २०२६ या कालावधीत लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. कारंजा रोडवरील गणेश मेडिकलजवळील पुणेरी कॅन्टीन परिसर आणि मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही लाच मागितल्याचे निष्पन्न झाले आहे.

या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस हवालदार मंगेश घाटे यांनी पूर्ण केली असून, प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार श्याम मडावी करत आहेत.

राज्याचे रक्षण करणाऱ्या पोलिसांनीच अशा प्रकारे लाचेची मागणी केल्याने सामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून, यामध्ये आणखी कोणाचे हात गुंतले आहेत का, याचा शोध घेतला जात आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!