NFSU भरती २०२६: केंद्र सरकारमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ५१ कायमस्वरूपी पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; २ लाख रुपयांपर्यंत पगार
पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे , १६ मार्च २०२६ | मॅक्स मंथन जॉब डेस्क:
पिंपरी चिंचवड : भारत सरकारच्या गृह मंत्रालयांतर्गत असलेल्या नॅशनल फॉरेन्सिक सायन्सेस युनिव्हर्सिटी (NFSU) मध्ये प्रशासकीय विभागात ५१ कायमस्वरूपी जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. शैक्षणिक क्षेत्रात आणि सरकारी प्रशासनात करिअर करू इच्छिणाऱ्या पदवीधर तरुणांसाठी ही एक मोठी संधी आहे.
-
पदाचे नाव: सेक्शन ऑफिसर (SO), डेप्युटी सेक्शन ऑफिसर (DSO) आणि असिस्टंट.
-
एकूण जागा: ५१ पदे.
-
पगार: १९,९०० रुपयांपासून ते २,१५,९०० रुपयांपर्यंत (पदांनुसार).
-
अर्जाची शेवटची तारीख: २३ मार्च २०२६ (रात्री ११:५९ वाजेपर्यंत).
NFSU ने तीन वेगवेगळ्या स्तरावरील पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली आहे. ७ व्या वेतन आयोगानुसार पगार खालीलप्रमाणे असेल:
| पद | रिक्त जागा | पे-लेव्हल | अंदाजे मासिक वेतन |
| सेक्शन ऑफिसर (SO) | १२ | लेवल ८ | ₹१,५६,१०० – ₹२,१५,९०० |
| डेप्युटी सेक्शन ऑफिसर (DSO) | १४ | लेवल ७ | ₹१,४४,२०० – ₹१,९८,६०० |
| असिस्टंट (Assistant) | २५ | लेवल २ | ₹१९,९०० – ₹६३,२०० |
-
शैक्षणिक पात्रता: उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे. (SO आणि DSO साठी ५५% गुणांची अट किंवा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे). संगणकाचे ज्ञान आणि इंग्रजी/हिंदी टायपिंगची जाण असणे महत्त्वाचे आहे.
-
वयोमर्यादा:
-
असिस्टंट: २१ ते ३५ वर्षे.
-
SO आणि DSO: २१ ते ४० वर्षे.
-
(SC/ST/OBC आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमानुसार ५ ते १० वर्षांची सवलत मिळेल.)
-
उमेदवारांची निवड पाच महत्त्वाच्या टप्प्यांत केली जाईल:
-
स्क्रीनिंग टेस्ट: अर्जांची छाननी (आवश्यकता भासल्यास).
-
लेखी परीक्षा: सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी.
-
कौशल्य चाचणी (Skill Test): संगणक टायपिंग आणि MS Office (Word/Excel) चे ज्ञान तपासले जाईल.
-
कागदपत्र पडताळणी: शैक्षणिक व इतर प्रमाणपत्रांची तपासणी.
-
वैद्यकीय तपासणी: सरकारी वैद्यकीय निकषांनुसार फिटनेस चेक.
इच्छुक उमेदवारांनी ‘Samarth Portal’ वर जाऊन ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.
-
अर्ज फी: जनरल/OBC/EWS उमेदवारांसाठी ५०० रुपये + GST. महिला आणि SC/ST/PwBD उमेदवारांसाठी कोणतीही फी नाही.
-
कामाचे ठिकाण: गांधीनगर, दिल्ली, गोवा, नागपूर यांसह देशातील १२ विविध कॅम्पसमध्ये नियुक्ती मिळू शकते.
© २०२६ मॅक्स मंथन जॉब अपडेट्स. सर्व हक्क राखीव।
