news
रहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुलपिंपरी-चिंचवडमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक करणारे आहेरकर कुटुंब नेवासामधून अटक! आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईजागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेतभारतातील म्युझिक इंडस्ट्रीला केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट; ‘PPL India’ ला मिळाली अधिकृत कॉपीराईट सोसायटी म्हणून मान्यता!मोरवाडीत पिंपरी-चिंचवड भाजपचा भव्य नियुक्ती सोहळा; भुजबळ, नेमाने, भालेराव, मोरे आणि शिर्के यांच्यावर नव्या आघाड्यांची जबाबदारी!
Home पिंपरी चिंचवड “अत्यावश्यक सेवा वगळता मुख्य मार्गांवर प्रवेश बंद!” पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी जारी केली अधिसूचना; सात दिवस तळेगावातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली

“अत्यावश्यक सेवा वगळता मुख्य मार्गांवर प्रवेश बंद!” पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी जारी केली अधिसूचना; सात दिवस तळेगावातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली

जिजामाता चौक अन् सुभाष चौक परिसरात बॅरिकेडिंग! गणपती चौकातून येणाऱ्या वाहनांसाठीही नवे नियम; यात्रा काळात वाहनचालकांनी सहकार्य करण्याचे तळेगाव वाहतूक विभागाचे आवाहन. (@२०२६ | मॅक्स मंथन ट्रॅफिक अपडेट)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love


सावधान! तळेगाव दाभाडे येथील ‘डोळसनाथ महाराज यात्रे’निमित्त वाहतुकीत मोठे बदल; ‘या’ मार्गांवर असेल प्रवेशबंदी


पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे, १६ मार्च २०२६ | मॅक्स मंथन ट्रॅफिक अपडेट:

तळेगाव दाभाडे : तळेगाव शहराचे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज यांचा यात्रा उत्सव दि. १९ मार्च ते २५ मार्च २०२६ या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या यात्रेसाठी राज्याच्या विविध भागांतून येणाऱ्या भाविकांची गर्दी आणि सुरक्षितता लक्षात घेऊन, पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने तळेगावमधील वाहतुकीत महत्त्वाचे बदल केले आहेत.

पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी याबाबतची अधिकृत अधिसूचना जारी केली असून, दि. १९ मार्च रोजी सकाळी ६:०० वाजल्यापासून ते २५ मार्च रोजी रात्री २४:०० वाजेपर्यंत हे बदल लागू राहतील.

१. जिजामाता चौक ते डोळसनाथ मंदिर मार्ग:

  • बदल: या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी असेल.

  • पर्यायी मार्ग: मारुती मंदिर चौक – जुनी नगर परिषद इमारत – संभाजी नगर – नालबंद गल्ली – गणपती चौक मार्गे इच्छित स्थळी जाता येईल.

२. सुभाष चौक ते डोळसनाथ मंदिर मार्ग:

  • बदल: सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंद.

  • पर्यायी मार्ग: मारुती मंदिर चौक – जुनी नगर परिषद इमारत – संभाजी नगर – गणपती चौक मार्गे पुढे जाता येईल.

३. घोरवाडी रेल्वे स्टेशनकडून येणारी वाहतूक:

  • बदल: जिजामाता चौक व मंदिराकडे जाण्यास गणपती चौकात प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

  • पर्यायी मार्ग: गणपती चौकातून उजवीकडे वळून नालबंद गल्ली – संभाजी नगर – जुनी नगर परिषद इमारत – मारुती मंदिर चौक मार्गे मार्गस्थ व्हावे.

  • वरील सर्व निर्बंध अत्यावश्यक सेवेतील वाहनांना (रुग्णवाहिका, फायर ब्रिगेड इ.) लागू राहणार नाहीत.

  • नागरिकांनी आणि वाहनचालकांनी या कालावधीत सहकार्य करावे आणि पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन तळेगाव वाहतूक विभागाने केले आहे.

यात्रेच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तळेगाव वाहतूक विभागामार्फत योग्य बॅरिकेडिंग आणि अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. ठिकठिकाणी माहिती फलक लावून वाहनचालकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।


You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!