news
Home पिंपरी चिंचवड “तलवार आणि आदर्श राज्यकारभाराचा वारसा!” मल्हारराव होळकर जयंतीनिमित्त नारायणराव भागवत यांचे अभ्यासपूर्ण व्याख्यान; अहिल्यादेवी सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती

“तलवार आणि आदर्श राज्यकारभाराचा वारसा!” मल्हारराव होळकर जयंतीनिमित्त नारायणराव भागवत यांचे अभ्यासपूर्ण व्याख्यान; अहिल्यादेवी सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती

मराठा साम्राज्याचा भगवा पंजाबपर्यंत नेणाऱ्या महान सेनानींचा गौरव! सांगवी विकास मंचचा पुढाकार; मल्हाररावांच्या पराक्रमाने इतिहास झाला जिवंत. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

अटकेपार झेंडा फडकविणाऱ्या सरदार मल्हारराव होळकर यांना सांगवीत अभिवादन! सांगवी विकास मंचतर्फे जयंती उत्साहात साजरी


पिंपरी चिंचवड प्रतिनिधी: बालाजी नवले, १७ मार्च २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

सांगवी : मराठा साम्राज्याचा भगवा ध्वज अटकेपार नेणारे महान सेनानी सरदार मल्हारराव होळकर यांची जयंती सांगवी येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सांगवी विकास मंच आयोजित या कार्यक्रमात मल्हारराव होळकर यांच्या पराक्रमाचे स्मरण करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन सांगवी विकास मंचचे अध्यक्ष महेशशेठ भागवत यांनी केले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मल्हारराव होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.

कार्यक्रमाचे मुख्य वक्ते, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नारायणराव भागवत यांनी मल्हारराव होळकर यांच्या जीवनचरित्रावर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले. “मराठा साम्राज्याचा विस्तार पंजाब आणि पेशावरपर्यंत नेण्यात मल्हाररावांचा मोठा वाटा होता. त्यांनी केवळ तलवार गाजवली नाही, तर इंदूर राज्याचा कारभार आपली स्नुषा अहिल्याबाई होळकर यांच्याकडे सोपवून एक आदर्श निर्माण केला,” अशा शब्दांत भागवत यांनी त्यांचा गौरव केला.

अहिल्यादेवी सेवा संघाचे माजी अध्यक्ष अभिमन्यू गाडेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले आणि मल्हारराव होळकर यांना अभिवादन केले. याप्रसंगी अहिल्यादेवी सेवा संघाचे माजी अध्यक्ष बाबासाहेब चितळकर, माजी कार्यकारी अध्यक्ष मनोजकुमार मारकड, माजी सदस्य कृष्णकांत गिरगुणे, ज्येष्ठ समाजसेवक, राष्ट्रसंत गाडगेबाबांचे अनुयायी मुरलीधर दळवी, सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष दिलीप फाकटकर, भरत कुंभार, आण्णासाहेब कुंभार आणि श्री. नगरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचा समारोप कृष्णकांत गिरगुणे यांनी मानलेल्या आभाराने झाला. सांगवीतील या जयंती उत्सवामुळे युवा पिढीला मराठा साम्राज्याच्या जाज्वल्य इतिहासाची माहिती मिळाली.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।


You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!