news
रहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुलपिंपरी-चिंचवडमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक करणारे आहेरकर कुटुंब नेवासामधून अटक! आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईजागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेतभारतातील म्युझिक इंडस्ट्रीला केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट; ‘PPL India’ ला मिळाली अधिकृत कॉपीराईट सोसायटी म्हणून मान्यता!मोरवाडीत पिंपरी-चिंचवड भाजपचा भव्य नियुक्ती सोहळा; भुजबळ, नेमाने, भालेराव, मोरे आणि शिर्के यांच्यावर नव्या आघाड्यांची जबाबदारी!
Home पिंपरी चिंचवड “अहिंसा चौक अन् सेव्हन ऑरेंज हॉस्पिटल मार्गे जावे!” पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांची अधिकृत अधिसूचना; सकाळी ५ ते दुपारी १ वाजेपर्यंत चाफेकर चौकात प्रवेशबंदी

“अहिंसा चौक अन् सेव्हन ऑरेंज हॉस्पिटल मार्गे जावे!” पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांची अधिकृत अधिसूचना; सकाळी ५ ते दुपारी १ वाजेपर्यंत चाफेकर चौकात प्रवेशबंदी

ईदगाह मैदानावर नमाज पठणासाठी भाविकांची मांदियाळी! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निगडी वाहतूक विभागाचे नियोजन; चंद्र दर्शनानुसार २१ मार्चला वाहतूक बदलांची अंमलबजावणी. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love


सावधान! रमजान ईदनिमित्त निगडी-चिंचवडमधील वाहतुकीत मोठे बदल; चाफेकर चौक परिसरातील ‘हे’ मार्ग राहतील बंद


पिंपरी चिंचवड प्रतिनिधी: बालाजी नवले, १८ मार्च २०२६ | मॅक्स मंथन ट्रॅफिक अपडेट:

चिंचवड : आगामी ‘रमजान ईद’निमित्त चिंचवड येथील चाफेकर चौक परिसरातील ईदगाह मैदानावर मोठ्या संख्येने नागरिक नमाज पठणासाठी एकत्र येतात. या पार्श्वभूमीवर, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने निगडी वाहतूक विभागाच्या हद्दीत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.

पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी याबाबतची अधिकृत अधिसूचना जारी केली असून, हे बदल चंद्र दर्शनानुसार दिनांक २१ मार्च २०२६ (एक दिवस मागे-पुढे) रोजी सकाळी ५:०० ते दुपारी १३:०० वाजेपर्यंत लागू राहतील.

१. मरिआई माता मंदिर ते चाफेकर चौक मार्ग:

  • बदल: या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी असेल.

  • पर्यायी मार्ग १: एस.के.एफ. कंपनीकडून डाव्या बाजूला वळून अहिंसा चौक मार्गे इच्छित स्थळी जाता येईल.

  • पर्यायी मार्ग २: मरिआई माता मंदिरापासून उजव्या बाजूला वळून ‘सेव्हन ऑरेंज हॉस्पिटल’च्या मागून मार्गस्थ व्हावे.

२. चाफेकर चौक ते मरिआई माता मंदिर मार्ग:

  • बदल: सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंद.

  • पर्यायी मार्ग १: चाफेकर चौक (जुना जकात नाका) येथून उजवीकडे वळून सेव्हन ऑरेंज हॉस्पिटल मार्गे जाता येईल.

  • पर्यायी मार्ग २: चाफेकर चौकाकडून उजव्या बाजूला वळून अहिंसा चौक मार्गे इच्छित स्थळी जाता येईल.

३. मोरया नगर ते चाफेकर चौक मार्ग:

  • बदल: सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंद.

  • पर्यायी मार्ग: हनुमान मंदिरापासून उजव्या बाजूला वळून सेव्हन ऑरेंज हॉस्पिटल मार्गे इच्छित स्थळी जाता येईल.

  • वरील सर्व निर्बंध अत्यावश्यक सेवेतील वाहनांना (रुग्णवाहिका, फायर ब्रिगेड इ.) लागू राहणार नाहीत.

  • चंद्र दर्शनानुसार तारखेत बदल झाल्यास हे आदेश त्या दिवशी लागू राहतील.

  • नागरिकांनी आणि वाहनचालकांनी या कालावधीत सहकार्य करावे आणि प्रशासनाने सुचवलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।


You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!