news
“पाशवी विकृतीचा कळस!” दोन्ही मुलांवर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याचा संशय; २५ वर्षीय नराधम नातेवाईकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या“१०% राखीव निधी हा गरीबांचा हक्क, उपकार नव्हे!” प्रत्येक रुग्णालयात ‘आयपीएफ’ माहितीचा फलक लावणे अनिवार्य करण्याची मागणी; डिजिटल डॅशबोर्डद्वारे ऑनलाईन डेटा उपलब्ध करण्याचा प्रस्ताव“राज्यातील २९ इन्क्यूबेशन सेंटर्सचे जाळे स्टार्टअप्सना देणार बळ!” मंत्री मंगल प्रभात लोढा यांचा निर्धार; मुंबईतील धोरणात्मक कार्यशाळेत सामंजस्य करारावर स्वाक्षरी“मतदारांच्या घरी जाऊन माहितीची जुळवणी करा!” निवडणूक कामात दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाईचे संकेत; ‘ॲप’द्वारे होणार मॅपिंग प्रक्रिया संगणीकृत“विद्यार्थीच होतील स्वच्छतेचे खरे दूत!” आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा विश्वास; मनपा शाळांमध्ये ‘कचरामुक्त’ मोहिमेचा श्रीगणेशा, महापौरांकडून उपक्रमाचे कौतुक
Home पुणे “पाशवी विकृतीचा कळस!” दोन्ही मुलांवर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याचा संशय; २५ वर्षीय नराधम नातेवाईकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

“पाशवी विकृतीचा कळस!” दोन्ही मुलांवर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याचा संशय; २५ वर्षीय नराधम नातेवाईकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

१२ वर्षीय मुलाच्या हत्येचा तपास करताना उघड झाले धक्कादायक वास्तव! बिबट्याच्या हल्ल्याचा बनाव रचून नराधमाने केला होता २१ महिन्यांपूर्वी दुसरा खून; पुणे ग्रामीण पोलिसांच्या तपासात 'सिरियल किलर' प्रवृत्तीचा नातेवाईक जेरबंद. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love


शिरूर हादरले! उसाच्या शेतातील त्या मृतदेहाने उघडले २१ महिन्यांपूर्वीच्या खुनाचे गुपित; ‘नरभक्षक बिबट्या’ नाही तर ‘नराधम नातेवाईक’च निघाला खुनी


पुणे/शिरूर प्रतिनिधी :बालाजी नवले. १९ मार्च २०२६ | मॅक्स मंथन क्राईम रिपोर्ट:

शिरूर : पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातून एक अत्यंत थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. एका १२ वर्षीय मुलाच्या हत्येचा तपास करताना पुणे ग्रामीण पोलिसांनी चक्क २१ महिन्यांपूर्वीच्या एका दुसऱ्या खुनाचा उलगडा केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या घटनेला आजवर ‘बिबट्याचा हल्ला’ मानले जात होते, तो बिबट्याचा हल्ला नसून एका नराधमाने केलेला अमानुष खून असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी २५ वर्षीय तरुण शेतकऱ्याला अटक केली असून, दोन्ही मुलांवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

मंगळवारी संध्याकाळी शिरूर तालुक्यातील एका उसाच्या शेतात ६ वीत शिकणाऱ्या १२ वर्षीय मुलाचा अर्धवट कपड्यांमधील मृतदेह आढळून आला. हा मुलगा एका शेतकरी कुटुंबातील होता. घटनेचे गांभीर्य ओळखून पुणे ग्रामीण पोलिसांनी तात्काळ तपासासाठी विविध पथके तैनात केली. तपासादरम्यान पोलिसांना मृताच्या एका दूरच्या नातेवाईकावर संशय आला. संशयित २५ वर्षीय आरोपीला ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच त्याने केवळ या मुलाचाच नाही, तर २१ महिन्यांपूर्वी याच जागी घडलेल्या दुसऱ्या एका गुन्ह्याची कबुली दिली.

२१ महिन्यांपूर्वी याच उसाच्या शेतात एका ११ वर्षीय मुलाचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत सापडला होता. त्यावेळी परिसरात बिबट्याची दहशत असल्याने आणि मृतदेहाची अवस्था पाहून तो ‘बिबट्याचा हल्ला’ असावा, असा कयास लावला गेला होता. मात्र, फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये बिबट्याच्या हल्ल्याचे ठोस पुरावे मिळाले नव्हते. आता अटक केलेल्या आरोपीने कबूल केले की, त्या मुलाचाही खून त्यानेच केला होता आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी तो बिबट्याचा हल्ला असल्याचा बनाव रचला होता.

दोन्ही मुलांचे मृतदेह अर्धवट कपड्यांमध्ये आणि उसाच्या शेतात एकाच ठिकाणी सापडल्यामुळे पोलिसांनी यामागे लैंगिक अत्याचाराचा (Sexual Assault) संशय व्यक्त केला आहे. आरोपीने मुलांना फूस लावून शेतात नेले आणि तिथे त्यांची हत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस आता दोन्ही प्रकरणांतील फॉरेन्सिक पुराव्यांची फेरपडताळणी करत आहेत.

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या पथकाने अत्यंत वेगाने तपास करून या ‘सिरियल किलर’ प्रवृत्तीच्या आरोपीला जेरबंद केले आहे. एका खुनाच्या तपासामुळे जुना गुंतागुंतीचा गुन्हा मार्गी लागल्याने पोलिसांचे कौतुक होत असले तरी, नातेवाईकानेच हे कृत्य केल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।


You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!