news
Home अकोला “बाळापूर तालुक्यातील जुगार अड्ड्याचा पर्दाफाश!” गुन्हे शाखेने (LCB) रंगेहात पकडले १७ आरोपी; शेगाव, अकोला आणि वाशिममधील जुगारांचे जाळे उघड

“बाळापूर तालुक्यातील जुगार अड्ड्याचा पर्दाफाश!” गुन्हे शाखेने (LCB) रंगेहात पकडले १७ आरोपी; शेगाव, अकोला आणि वाशिममधील जुगारांचे जाळे उघड

लोहारा शेतशिवारात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल. अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले; पोलीस अधीक्षक अचिंत चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला पोलिसांचा 'ॲक्शन मोड'. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love


अकोल्यात ‘ऑपरेशन प्रहार’चा धडाका; जुगार अड्ड्यावर छापा टाकून ४.३६ लाखांचा मुद्देमाल जप्त

अकोला /मुर्तिजापुर प्रतिनिधी विलास सावळे, २३ मार्च २०२६, मॅक्स मंथन डेली न्यूज:

अकोला: अकोला जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांविरुद्ध पोलीस अधीक्षक अचिंत चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑपरेशन प्रहार’ ही विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) बाळापूर तालुक्यातील लोहारा शेतशिवारात सुरू असलेल्या एका मोठ्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून तब्बल ४ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

२१ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६:१० वाजताच्या सुमारास लोहारा शेतशिवारात जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक अचिंत चांडक यांना मिळाली होती. त्यांनी तातडीने स्थानिक गुन्हे शाखेच्या निरीक्षकांना पथक रवाना करण्याचे आदेश दिले. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला असता, १७ आरोपी जुगार खेळताना रंगेहात सापडले.

या कारवाईत पोलिसांनी एकूण १७ जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये प्रामुख्याने निखिल श्रीकृष्ण अग्रवाल (३५, रा. पंचगव्हाण), सागर साहेबराव नांदोकर (४०, रा. भूत बंगला, शेगाव), गणेश महादेव ताथोड (रा. हातरून, जि. अकोला), अजय लक्ष्मण चंडाळणे (४५, रा. शेगाव), आशिष दिगंबर ठाकरे (रा. रोकडिया नगर, शेगाव), अमीन इसामेर देशमुख (४३, रा. लोहारा), अक्षय संतोष मोहोळ (२४, रा. उमरी, अकोला), आसिफ लतीफ देशमुख (रा. लोहारा), संतोष रामगीर गिरी (५२, रा. एकलारा), धरम गणेश सारवाण (रा. अकोट रोड, शेगाव), अंकुश श्रीराम मेटांगे (३२, रा. झुरळ), सचिन बाबुराव कोकाटे (४०, रा. एकलारा), सतीश गोपाल झगडे (२६, रा. एकलारा), सागर संजय खांदोडे (३५, रा. शेगाव), मंगेश तेजराव हिंगणे (४०, रा. भूत बंगला, शेगाव), ज्ञानेश्वर सुरेश गारमोडे (४०, रा. बालाजी नगर, शेगाव) आणि गजानन वसंत देशमुख (३५, रा. रिसोड, जि. वाशिम) यांचा समावेश आहे.

पोलिसांनी घटनास्थळावरून खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त केला आहे:

  • नगदी रक्कम: ₹९६,०००/-

  • मोबाईल फोन: ७ नग (किंमत ₹७०,०००/-)

  • मोटारसायकल: ३ नग (किंमत ₹२,७०,०००/-)

  • इतर साहित्य: ५२ ताश पत्त्यांचे संच

  • एकूण किंमत: ₹४,३६,०००/-

सदरची धाडसी कारवाई पोलीस अधीक्षक अचिंत चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात एपीआय विजय चव्हाण, हेड कॉन्स्टेबल महेंद्र मलिया, उमेश पराये, भास्कर धोत्रे, कुशाल नेमाडे, रवी खंडारे, पोलीस कॉन्स्टेबल राज चंदेल, करण मानकर, अभिषेक पाठक, श्रीकांत पातोंड, चालक जीपीएसआय ठाकरे व पोलीस कॉन्स्टेबल खरात यांचा समावेश होता.

जिल्ह्यातील अवैध धंदे पूर्णपणे मोडीत काढण्यासाठी अकोला पोलीस दल सतर्क असून ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत अशीच कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!