खामगावात जनसागराचा ‘विराट आक्रोश’! लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा नियमाकुल करण्यासाठी परिमल कांबळेंचे रणशिंग; प्रशासनाला दिला निर्वाणीचा इशारा
खामगाव प्रतिनिधी :विलास सावळे,२३ मार्च २०२६ | मॅक्स मंथन विशेष:
खामगाव (बुलढाणा) : “साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे केवळ एका समाजाचे नसून संपूर्ण देशाचे भूषण आहेत. खामगाव शहरात दोन दिवसांपूर्वी स्थापित झालेला त्यांचा पुतळा प्रशासनाने तातडीने नियमाकुल करावा आणि त्या ठिकाणी भव्य स्मारक उभारून सौंदर्यीकरण करावे,” अशी ठाम मागणी सामाजिक कार्यकर्ते परिमल कांबळे यांनी केली आहे. या मागणीसाठी आज खामगाव शहरात हजारो समाजबांधवांच्या उपस्थितीत ‘विराट आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला.
स्थानिक युवकांच्या संघर्षाला बळ देण्यासाठी परिमल कांबळे आपल्या शेकडो समर्थकांसह रेल्वे स्टेशन चौकात उपस्थित झाले होते. यावेळी निळ्या आणि भगव्या निशाणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
खामगावमध्ये दोन दिवसांपूर्वी अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवण्यात आला होता. मात्र, तांत्रिक आणि कायदेशीर बाबींचे कारण देत प्रशासनाने त्यावर आक्षेप घेतल्याने स्थानिक युवकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर निघालेल्या मोर्चात तरुण-तरुणी, माता-भगिनी आणि आक्रमक युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
प्रमुख मागण्या:
-
अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा कायमस्वरूपी आणि नियमाकुल (Regularize) करावा.
-
पुतळ्याच्या ठिकाणी भव्य स्मारकाची निर्मिती करावी.
-
परिसराचे तातडीने सौंदर्यीकरण करावे.
आंदोलनादरम्यान परिमल कांबळे यांनी पोलीस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासनाशी सविस्तर चर्चा केली. “खामगावमधील जनतेच्या भावना अत्यंत तीव्र आहेत. या संदर्भात मी स्वतः वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करणार असून, अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी शर्तीचे प्रयत्न केले जातील,” असे आश्वासन त्यांनी उपस्थित जनसमुदायाला दिले.
या आक्रोश मोर्चात विलासराव मानवतकर, नानासाहेब शिंदे, आशुतोष खंडारे, सोपान वानखडे, नितीन सोनवणे, आशिष साळवे, कृष्णा नाटेकर, सुरेश बोरकर, लखन सोनोने, विनोद खवेकर, श्री. सकट साहेब, सुरेश तांबे, विनोद चव्हाण, गणेश चांदणे, अर्जुन कासारकर, योगेश नाटेकर, किशोर गायकवाड, योगेश साबळे, सुभाष वानखेडे, रुपेश अवचार यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।


