news
रहाटणीत आंतरराष्ट्रीय योगदिनाचा उत्साह! आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी महाराज उद्यानात सामूहिक योगसाधनापिंपरी मनपा मुख्यालयाबाहेर ‘मॅक्स मंथन’च्या बातमीचा महाप्रभाव! ‘डेथ ट्रॅप’ ठरलेले ड्रेनेज चेंबर सुट्टीच्या दिवशी युद्धपातळीवर दुरुस्तपुर्णा नगरमध्ये वाळलेल्या झाडांमुळे मृत्यूची टांगती तलवार; वारंवार तक्रार करूनही मनपा उद्यान विभागाचे ‘डोळेझाक’!पिंपळे सौदागरच्या लिनिअर गार्डनमध्ये रंगला भक्ती आणि योगाचा अनोखा संगम! ‘द आर्ट ऑफ लिविंग’ आणि भाजपचा संयुक्त उपक्रमरहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुल
Home पिंपरी चिंचवड “तज्ञ बना आणि यशाची शिखरे पादाक्रांत करा!” पीसीइटीच्या पीसीसीओइमध्ये माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आणि मार्गदर्शक परिसंवाद संपन्न

“तज्ञ बना आणि यशाची शिखरे पादाक्रांत करा!” पीसीइटीच्या पीसीसीओइमध्ये माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आणि मार्गदर्शक परिसंवाद संपन्न

पीसीसीओइच्या माजी विद्यार्थ्यांच्या यशोगाथांचा प्रवास आता पुस्तकरूपात! उपसंचालक डॉ. निळकंठ चोपडे यांच्या हस्ते 'स्मरणिके'चे अनावरण; जगभरात यश संपादन करणाऱ्या 'स्टार्स'चा महाविद्यालयात गौरव. | @ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love


PCCOE केवळ इंजिनिअर नाही, तर सुसंस्कृत नागरिक घडवते! ‘गॅलेक्सी ऑफ पीसीसीओइ स्टार्स’ स्मरणिकेचे दिमाखदार प्रकाशन; माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात


पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :आकाश कांबळे ,२५ मार्च २०२६ | मॅक्स मंथन शैक्षणिक विशेष:

पिंपरी : “पीसीसीओइच्या माजी विद्यार्थ्यांनी जगभरात नोकरी आणि उद्योगात जे यश संपादन केले आहे, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. येथे केवळ तांत्रिक ज्ञान दिले जात नाही, तर एक जबाबदार, सुसंस्कृत आणि मानवतावादी दृष्टिकोन असलेला नागरिक घडवण्याचे काम केले जाते,” असे प्रतिपादन पीसीसीओइचे उपसंचालक डॉ. निळकंठ चोपडे यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (PCET) पीसीसीओइ महाविद्यालयात आयोजित माजी विद्यार्थी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी विद्यार्थ्यांच्या यशोगाथा असलेल्या “गॅलेक्सी ऑफ पीसीसीओइ स्टार्स” या विशेष स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

पीसीइटीचे सेंट्रल ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख डॉ. शितलकुमार रवंदळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना यशाचा मंत्र दिला. ते म्हणाले, “उत्कृष्ट करिअरसाठी स्वतःला एखाद्या विषयात तज्ञ बनवणे आवश्यक आहे. इंजिनिअरिंग झाले असले तरी, ज्या क्षेत्रात तुमची आवड आहे तिथे तुम्ही करिअर करू शकता. तुमचा आत्मविश्वास कधीही डळमळू देऊ नका.” ही स्मरणिका सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभाचे काम करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी ‘उद्योग व शिक्षण क्षेत्रातील दरी कमी करणे’ या विषयावर आयोजित परिसंवादात माजी विद्यार्थ्यांनी मोलाचे सल्ले दिले:

  • डेनिस थॉमस: “इंटर्नशिप आणि स्व-अध्ययन हीच यशाची गुरुकिल्ली आहे. स्वतःला सतत अपडेट ठेवून नवीन गोष्टी शिकत राहा.”

  • शबरीश नायर: “सेल्स आणि मार्केटिंगला टाळू नका, त्यातून येणारे अनुभव तुम्हाला लोकांशी जोडण्यासाठी मदत करतात.”

  • प्रसाद श्रीरामे: “कॉलेजने आम्हाला केवळ इंजिनिअरिंग शिकवले नाही, तर एन.एस.एस. कॅम्पच्या माध्यमातून जीवनमूल्ये आणि मानवता शिकवली. इथली ऊर्जा आम्हाला संकटात पुन्हा उभे राहण्याचे बळ देते.”

  • प्रवीण भोर: “मराठी माणसाची प्रतिष्ठा जपण्यासाठी ‘गर्जे मराठी’च्या माध्यमातून काम करणे अभिमानास्पद आहे.”

या सोहळ्याला देश-परदेशातून आलेले २०० हून अधिक माजी विद्यार्थी उपस्थित होते. पीसीइटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई आणि संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा यशस्वीरीत्या पार पडला.

कार्यक्रमाच्या संयोजनात प्रा. हिना शर्मा, विजय टोपे, ऋषिकेश पांडे यांच्यासह विद्यार्थी प्रतिनिधी निशांत कुलकर्णी आणि प्रसाद कोलते यांनी विशेष परिश्रम घेतले.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।


You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!