news
रहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुलपिंपरी-चिंचवडमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक करणारे आहेरकर कुटुंब नेवासामधून अटक! आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईजागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेतभारतातील म्युझिक इंडस्ट्रीला केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट; ‘PPL India’ ला मिळाली अधिकृत कॉपीराईट सोसायटी म्हणून मान्यता!मोरवाडीत पिंपरी-चिंचवड भाजपचा भव्य नियुक्ती सोहळा; भुजबळ, नेमाने, भालेराव, मोरे आणि शिर्के यांच्यावर नव्या आघाड्यांची जबाबदारी!
Home अकोला सासरच्या मंडळींकडून विवाहितेचा छळ; मूर्तिजापूर पोलिसांत बीएनएस कलमान्वये गुन्हा नोंद!

सासरच्या मंडळींकडून विवाहितेचा छळ; मूर्तिजापूर पोलिसांत बीएनएस कलमान्वये गुन्हा नोंद!

"वडिलांनी लग्नात खर्च केला नाही" म्हणत टोमणे आणि मारहाण; पीडितेने 'भरोसा सेल'च्या मदतीने फोडला अन्यायाला वाचा. ९ वर्षांच्या प्रदीर्घ छळानंतर पतीसह सासू आणि इतर नातेवाईकांवर गुन्हा दाखल. | @ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love


हुंड्यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ! मूर्तिजापूर शहर पोलिसांत पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल


अकोला /मुर्तिजापुर प्रतिनिधी विलास सावळे, २५ मार्च २०२६ | मॅक्स मंथन क्राईम डायरी:

मूर्तिजापूर : “तुझ्या वडिलांनी लग्नात खर्च केला नाही आणि आता त्यांच्याकडून पैसे आण,” या कारणावरून विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या चार जणांविरुद्ध मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत महिलेने ‘भरोसा सेल’ आणि पोलिसांकडे धाव घेऊन आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली आहे.

फिर्यादी गिता संजय चांडसकर (वय ३५, रा. वाल्मीक नगर, स्टेशन एरिया, मूर्तिजापूर; मूळ रा. जानेफळ, जि. बुलढाणा) यांचा विवाह समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे झाला होता. त्यांना एक लहान मुलगी आहे. लग्नानंतर काही काळ लोटल्यानंतर पती आणि सासरच्या मंडळींनी क्षुल्लक कारणावरून गिता यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. “तुझ्या वडिलांनी लग्नात पुरेसा खर्च केला नाही,” असे टोमणे मारत वडिलांकडून पैसे आणण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात होता.

मिळालेल्या माहितीनुसार, हा छळ २८ फेब्रुवारी २०१७ पासून २४ मार्च २०२६ पर्यंत सातत्याने सुरू होता. आरोपींनी गिता यांना केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिक त्रास देऊन शिवीगाळ व मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. अखेर सहनशक्ती संपल्याने पिडीत महिलेने मूर्तिजापूर पोलिसांत तक्रार दाखल केली.

पोलीसांनी खालील आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे:

१. संजय रतजी चांडसकर (पती, वय ४८ वर्षे)

२. शांताबाई रतजी चांडसकर (सासू, वय ६० वर्षे)

३. किर्ती राजू चांडसकर (वय ३० वर्षे)

४. कल्पना रामा चांडसकर (वय २८ वर्षे)

(सर्व रा. जानेफळ रमा नगर, ता. मेहकर, जि. बुलढाणा)

पिडीत महिलेचा जबानी रिपोर्ट आणि ‘भरोसा सेल’ कडून प्राप्त झालेला अहवाल यावरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ८५, ११५(२), ३५१(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा (अ.क्र. ३३२/२०२६) दाखल केला आहे.

सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार सुरेश पांडे (ब.नं. १०९९) करीत आहेत. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया महिला सहाय्यक फौजदार उज्ज्वला भाले (ब.नं. ७८७) यांनी पार पाडली.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।


You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!