सावधान! हिंजवडी आणि वाकड परिसरात २ एप्रिलला वाहतुकीत मोठे बदल; म्हातोबा देवाच्या ‘बगाड’ मिरवणुकीसाठी ५० हजार भाविक जमण्याची शक्यता
पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे, २८ मार्च २०२६ | मॅक्स मंथन वाहतूक अपडेट:
पिंपरी-चिंचवड : हिंजवडीचे ग्रामदैवत श्री म्हातोबा देवाची यात्रा आणि पारंपरिक ‘बगाड’ मिरवणुकीनिमित्त गुरुवार, २ एप्रिल २०२६ रोजी हिंजवडी, वाकड आणि सांगवी परिसरातील वाहतूक व्यवथात मोठे बदल करण्यात आले आहेत. दुपारी ३ वाजता निघणाऱ्या या मिरवणुकीत सुमारे ४० ते ५० हजार भाविक उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी ही अधिसूचना निर्गमित केली आहे.
हे बदल दुपारी १२:०० ते रात्री १०:०० वाजेपर्यंत किंवा मिरवणूक संपेपर्यंत लागू राहतील.
१. हिंजवडी विभाग: बंद रस्ते आणि पर्यायी मार्ग
-
टाटा टी चौक ते वाकड नाका: या दरम्यान सर्व वाहनांना मनाई.
-
पर्याय: विप्रो सर्कल फेज २ कडून येणारी वाहतूक लक्ष्मी चौक – भूमकर चौक मार्गे वळवण्यात आली आहे.
-
-
जॉमेट्रीक सर्कल ते वाकड नाका: प्रवास बंद.
-
पर्याय: मेझा-९ चौकातून डावीकडे वळून लक्ष्मी चौक – भूमकर चौक मार्गे इच्छित स्थळी जाता येईल.
-
-
शिवाजी चौक ते भूमकर चौक: प्रवास बंद.
-
पर्याय: इंडियन ऑईल चौक मार्गे वाकड हायवेने प्रवास करावा.
-
२. वाकड विभाग: बंद रस्ते आणि पर्यायी मार्ग
-
कस्पटे चौक ते वाकडगाव चौक: प्रवेश बंद.
-
पर्याय: कस्पटे चौकातून उजवीकडे वळून जगताप डेअरी चौक मार्गे जावे.
-
-
मानकर चौक ते वाकडगाव चौक: प्रवेश बंद.
-
पर्याय: काळेवाडी फाटा किंवा कस्पटे चौक मार्गे पर्यायी मार्ग वापरावा.
-
-
दत्तमंदिर रोड (उत्कर्ष चौक) ते वाकडगाव: प्रवेश बंद.
-
पर्याय: म्हातोबा चौक किंवा दत्तमंदिर रोडचा अंतर्गत वापर करावा.
-
३. सांगवी विभाग (पिंपळे गुरव यात्रा)
-
दत्त मंदिर चौक ते पिंपळे गुरव कमान: रस्ता पूर्णपणे बंद राहील.
-
पर्याय: बँक ऑफ महाराष्ट्रकडून शिवगणेश चौक मार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे.
-
वाहतूक पोलिसांनी नागरिकांना विनंती केली आहे की, या दिवशी आयटी पार्क (Hinjewadi IT Park) आणि परिसरातून प्रवास करताना पर्यायी मार्गांचा वापर करावा. अत्यावश्यक सेवेतील वाहने (रुग्णवाहिका, फायर ब्रिगेड) आणि मिरवणुकीतील वाहने यांना यातून सवलत देण्यात आली आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।
