news
Home पिंपरी चिंचवड रहाटणीकरांना दिलासा! गजानन नगरमध्ये आता ‘फुल’ दाबाने येणार पाणी; नगरसेवक त्रिभुवन यांनी सोडवली अडचण

रहाटणीकरांना दिलासा! गजानन नगरमध्ये आता ‘फुल’ दाबाने येणार पाणी; नगरसेवक त्रिभुवन यांनी सोडवली अडचण

आमदार शंकरभाऊ जगतापांच्या मार्गदर्शनाखाली नवीन जलवाहिनीचे काम पूर्ण; कमी दाबाने पाणी येण्याची तक्रार मार्गी | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

गजानन नगरमधील पाणी समस्या सुटली! नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांच्या पाठपुराव्याला यश

 

 

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, ९ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली:

रहाटणी: रहाटणी प्रभागातील गजानन नगर परिसरातील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून भेडसावत असलेल्या पाण्याच्या कमी दाबाच्या समस्येतून अखेर सुटका मिळाली आहे. नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांच्या प्रयत्नांमुळे या भागातील नवीन जलवाहिनी मुख्य जलवाहिनीला जोडण्याचे काम यशस्वीपणे पूर्ण झाले आहे.

गजानन नगरमध्ये पाण्याचा दाब कमी असल्याने रहिवाशांना दैनंदिन गरजांसाठी पाणी मिळवताना अडचणी येत होत्या. या संदर्भात स्थानिक नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची तात्काळ दखल घेत स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला.

प्रशासकीय मान्यतेनंतर, या भागातील नवीन जलवाहिनीला जुन्या मुख्य जलवाहिनीशी जोडण्याचे तांत्रिक काम पूर्ण करण्यात आले. यामुळे आता परिसरातील घराघरांमध्ये नियमित आणि पुरेशा दाबाने पाणी पोहोचणार आहे. या कामामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये समाधानाचे वातावरण असून त्यांनी नगरसेवक त्रिभुवन यांचे आभार मानले आहेत.

याप्रसंगी पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता ऋषिकेश गेंगजे, कनिष्ठ अभियंता समीक्षा मालपुरे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


“नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवणे ही आमची प्राथमिकता आहे. गजानन नगरमधील पाण्याची समस्या आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या सहकार्याने मार्गी लागली आहे. भविष्यातही प्रभागातील इतर विकासकामे आणि नागरिकांच्या तक्रारींना प्राधान्य देऊन त्या सोडविण्यावर माझा भर राहील.”

— बाबासाहेब त्रिभुवन, नगरसेवक, पिंपरी चिंचवड मनपा

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!