news
रहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुलपिंपरी-चिंचवडमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक करणारे आहेरकर कुटुंब नेवासामधून अटक! आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईजागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेतभारतातील म्युझिक इंडस्ट्रीला केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट; ‘PPL India’ ला मिळाली अधिकृत कॉपीराईट सोसायटी म्हणून मान्यता!मोरवाडीत पिंपरी-चिंचवड भाजपचा भव्य नियुक्ती सोहळा; भुजबळ, नेमाने, भालेराव, मोरे आणि शिर्के यांच्यावर नव्या आघाड्यांची जबाबदारी!
Home पिंपरी चिंचवड स्त्री-शिक्षणाची पंढरी असलेल्या ओतूरच्या शाळा नंबर १ मध्ये महात्मा फुले जयंती साजरी

स्त्री-शिक्षणाची पंढरी असलेल्या ओतूरच्या शाळा नंबर १ मध्ये महात्मा फुले जयंती साजरी

'सत्यशोधक' निर्माते अप्पा बोराटे आणि प्राचार्य डॉ. मंडलिक यांच्या उपस्थितीत उत्साही सोहळा; विद्यार्थिनींच्या वाढदिवसाचा आनंद द्विगुणित | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

महात्मा फुलेंनी १८४८ मध्ये सुरू केलेल्या ओतूरच्या शाळेत जयंतीचा उत्साह; ‘सत्यशोधक’ निर्मात्यांची उपस्थिती

 

पुणे/ओतूर प्रतिनिधी आकाश कांबळे, १२ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

ओतूर: क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांनी ५ डिसेंबर १८४८ रोजी ओतूर येथे मुलींची पहिली प्राथमिक शाळा (नंबर १) सुरू करून स्त्री-शिक्षणाची दारे उघडी केली होती. याच ऐतिहासिक शाळेत महात्मा फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शिक्षक आणि विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महापुरुषाला अभिवादन केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी ‘सत्यशोधक’ चित्रपटाचे निर्माते अप्पा बोराटे आणि प्राचार्य डॉ. चंद्रकांत मंडलिक यांच्या हस्ते महात्मा फुले तसेच त्यांना शाळा सुरू करण्यास साथ देणारे कै. भाऊ डुंबरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रमेश बोराटे, मुख्याध्यापक रवींद्र डुंबरे, ॲड. जयदीप डुंबरे आणि शरद ताजने उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. चंद्रकांत मंडलिक यांनी आपल्या भाषणात सांगितले की, महात्मा फुलेंचा समतेचा विचार समाजापर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे. “महात्मा फुले यांनी केवळ शिक्षणच नव्हे, तर शेती, व्यवसाय आणि अर्थकारण या विषयांवरही आपल्या कृतीतून आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या स्त्री-शिक्षणामुळेच आज महिला सर्वच क्षेत्रांत प्रगतीचा ठसा उमटवत आहेत,” असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि ‘सत्यशोधक’ चित्रपटाचे निर्माते अप्पा बोराटे यांनी महात्मा फुलेंच्या कार्याचा आढावा घेताना आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, “महात्मा फुलेंच्या जीवनावर चित्रपट तयार करण्याचे माझे स्वप्न पूर्ण झाले आहे. फुलेंनी २०० वर्षांपूर्वी ओतूरमध्ये बांधलेली शाळेची इमारत आजही सुस्थितीत आहे, हे पाहून समाधान वाटते. त्यांनी केवळ एका समाजासाठी नव्हे, तर सर्व जाती-धर्मांसाठी शैक्षणिक आणि सामाजिक एकतेचे महान कार्य केले आहे.”

या कार्यक्रमाचे औचित्य साधून शाळेतील अनेक विद्यार्थिनींचा वाढदिवस पेढे आणि नाश्ता देऊन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र डुंबरे, प्रमोद बोडके आणि महिला शिक्षिकांनी या कार्यक्रमाचे नेटके आयोजन केले होते. शिक्षिका संगीता हिले यांनी उपस्थितांचे आभार मानले.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!