news
रहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुलपिंपरी-चिंचवडमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक करणारे आहेरकर कुटुंब नेवासामधून अटक! आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईजागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेतभारतातील म्युझिक इंडस्ट्रीला केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट; ‘PPL India’ ला मिळाली अधिकृत कॉपीराईट सोसायटी म्हणून मान्यता!मोरवाडीत पिंपरी-चिंचवड भाजपचा भव्य नियुक्ती सोहळा; भुजबळ, नेमाने, भालेराव, मोरे आणि शिर्के यांच्यावर नव्या आघाड्यांची जबाबदारी!
Home पिंपरी चिंचवड ‘क्रांतितीर्था’तून घडणार राष्ट्रप्रेमी पिढी! आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडून चापेकर संग्रहालयाचे कौतुक

‘क्रांतितीर्था’तून घडणार राष्ट्रप्रेमी पिढी! आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडून चापेकर संग्रहालयाचे कौतुक

पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या उपस्थितीत प्रलंबित कामांचा आढावा; संग्रहालय लवकरच पूर्ण क्षमतेने सुरू होणार | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

क्रांतिवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालय प्रत्येकाला देशप्रेमाची प्रेरणा देणारी ठरेल – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २२ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

चिंचवड: “क्रांतिवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालयाचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करण्यात येईल. ही वास्तू येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आणि पिढीला देशप्रेमाची प्रेरणा देणारी ठरेल,” असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले.

अक्षय तृतीया आणि नुकत्याच झालेल्या क्रांतिवीर दामोदर हरी चापेकर यांच्या १२८ व्या स्मृतिदिनाचे (१८ एप्रिल) औचित्य साधून आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पत्नी डॉ. आरती सूर्यवंशी यांच्यासह चिंचवड येथील ‘क्रांतितीर्थ’ या चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालयाला भेट दिली. यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, कार्यवाह ॲड. सतीश गोरडे, अतुल आडे, महापालिका उपायुक्त पंकज पाटील तसेच थडकआय स्टुडिओच्या मैथिली कुलकर्णी उपस्थित होते.

संग्रहालयाची पाहणी केल्यानंतर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, “एका प्रेरणादायी, क्रांतिकारी आणि राष्ट्रप्रेमी कुटुंबाच्या वाड्याला पाहून मन भारावून गेले. लहानपणी क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या बलिदानाचा जाज्वल्य इतिहास ऐकला होता, तो या संग्रहालयाच्या माध्यमातून आज प्रत्यक्ष अनुभवता आला. या वास्तूमधून प्रत्येकाला राष्ट्रप्रेमाची शिकवण मिळेल, याची मला खात्री आहे.”

आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी यावेळी चापेकर वाडा येथील प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेतला. संग्रहालयाचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करण्याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. ही वास्तू लवकरच पूर्ण क्षमतेने नागरिकांसाठी उपलब्ध होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या पराक्रमाची गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हे संग्रहालय एक महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!