news
रहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुलपिंपरी-चिंचवडमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक करणारे आहेरकर कुटुंब नेवासामधून अटक! आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईजागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेतभारतातील म्युझिक इंडस्ट्रीला केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट; ‘PPL India’ ला मिळाली अधिकृत कॉपीराईट सोसायटी म्हणून मान्यता!मोरवाडीत पिंपरी-चिंचवड भाजपचा भव्य नियुक्ती सोहळा; भुजबळ, नेमाने, भालेराव, मोरे आणि शिर्के यांच्यावर नव्या आघाड्यांची जबाबदारी!
Home पिंपरी चिंचवड सावित्री, जिजाऊ अन् रमाईंच्या लेकींमुळे लोकशाही बळकट! उपमहापौर शर्मिला बाबर यांचे गौरवोद्गार

सावित्री, जिजाऊ अन् रमाईंच्या लेकींमुळे लोकशाही बळकट! उपमहापौर शर्मिला बाबर यांचे गौरवोद्गार

महिला पत्रकार संघाकडून नगरसेविका व सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान; स्नेह मेळाव्यात मान्यवरांची मांदियाळी | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

महिलांच्या त्यागामुळेच कुटुंबाची व देशाची प्रगती – उपमहापौर शर्मिला बाबर

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, ३० एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: कुटुंबाच्या प्रगतीसाठी महिलांना अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. महिलांच्या त्यागामुळेच त्यांच्या कुटुंबाची आणि देशाची प्रगती होते. आज देशाच्या राष्ट्रपती पदावर, राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला कार्यरत आहेत. या सर्व सावित्रीच्या, जिजाऊंच्या आणि रमाईच्या लेकींमुळेच देशातील लोकशाही बळकट होत आहे, असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौर शर्मिला बाबर यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महिला पत्रकार संघाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मंगळवारी (दि. २८) स्नेह मेळावा व नवनिर्वाचित नगरसेविका, बचत गटांच्या अध्यक्षा आणि महिला पत्रकारांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमहापौर बाबर बोलत होत्या. वर्षातील केवळ एक दिवस महिला दिन साजरा करण्याऐवजी रोज महिलांचा मान-सन्मान राखून त्यांचे कौतुक केले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

या कार्यक्रमास पिंपरी-चिंचवड मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे, पक्षनेते प्रशांत शितोळे, नगरसेविका सारिका मासुळकर, शीतल वर्णेकर, सुप्रिया चांदगुडे, वर्षा जगताप, अनुराधा गोरखे, शालिनी गुजर, अर्चना सस्ते, रवीना आंगोळकर, सुजाता बोराटे, स्नेहा कलाटे, तृप्ती कांबळे, शिवानी नरळे आणि महिला पत्रकार संघाच्या अध्यक्ष अर्चना मेंगडे उपस्थित होत्या.

तसेच श्रद्धा प्रभुणे, सायली कुलकर्णी, माधुरी कोराड, मंदा बनसोडे, प्राजक्ता जाधव, श्रद्धा कोतवडेकर, लीना माने, ज्येष्ठ पत्रकार माधव सहस्त्रबुद्धे, बाळासाहेब ढसाळ, अनिल कातळे, प्रवीण शिर्के, देवा भालके, सुनील उर्फ बाबू कांबळे, अविनाश कांबीकर, विनय लोंढे, दिनेश दुधाळ, रोहित खर्गे, विशाल जाधव आणि दादाराव आढाव आदी मान्यवर उपस्थित होते.

महिला पत्रकार संघाच्या वतीने सर्व नगरसेविका, बचत गट अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्त्या आणि ज्येष्ठ पत्रकारांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व तुळशीचे रोप देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी अभिषेक बारणे, प्रशांत शितोळे आणि बाळासाहेब ढसाळ यांनीही उपस्थित महिलांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे स्वागत अर्चना मेंगडे यांनी केले, सूत्रसंचालन संदीप साकोरे यांनी केले तर आभार श्रद्धा प्रभुणे यांनी मानले.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!