श्रीक्षेत्र शेगाव येथे श्री परमहंस परशराम महाराज महिमा ग्रंथाचा भव्य सामूहिक पारायण सोहळा संपन्न!
शेगाव प्रतिनिधी जयकुमार चर्जन , ८ जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
शेगाव: “श्री परमहंस परशराम महाराज सेवाधारी परिवार, जळतापूर/पिंपळोद यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला श्री परमहंस परशराम महाराज यांच्या महिमा ग्रंथांचा भव्य सामूहिक पारायण सोहळा रविवार, दि. ७ जून २०२६ रोजी श्रीक्षेत्र शेगाव येथे अत्यंत भक्तिमय, शिस्तबद्ध व अभूतपूर्व अशा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या आध्यात्मिक सोहळ्यामध्ये महाराष्ट्राच्या विविध कोपऱ्यांतून आलेल्या शेकडो सेवेकरी व गुरव समाज बांधवांनी एकत्र येत पारायण केले.”
शेगाव येथील रेल्वे स्टेशन व एसटी स्टँडसमोरील प्रसिद्ध ‘श्री माहेश्वरी भवन’ येथे रविवार रोजी सकाळी ठीक ८:३० वाजता या सामूहिक पारायणास अत्यंत मंगलमय वातावरणात प्रारंभ झाला. या सोहळ्यासाठी अमरावती, अकोला, छत्रपती संभाजीनगर, पुणे, मुंबई आणि नागपूरसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून शेकडो भाविक शेगावात दाखल झाले होते.
हातामध्ये महिमा ग्रंथ आणि मुखात महाराजांच्या नावाचा जयघोष करत सर्व भक्तांनी या ऐतिहासिक धार्मिक महोत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सामूहिक वाचनाच्या वेळी अखंड नामाचा गजर आणि पवित्र मंत्रोच्चारामुळे संपूर्ण माहेश्वरी भवन परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला होता.
पारायणाची सांगता झाल्यानंतर उपस्थित सर्व भाविकांनी श्री परमहंस परशराम महाराजांच्या महिमा ग्रंथातील दिव्य उपदेश, समाजोपयोगी विचार आणि त्यांच्या जीवन चरित्राचे सामूहिक चिंतन केले. आजच्या धकाधकीच्या युगात महाराजांचे विचार संपूर्ण मानवी कल्याण साधण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे व मार्गदर्शक आहेत, असा सूर यावेळी भाविकांमधून व्यक्त झाला.
पारायण सोहळ्यानंतर उपस्थित सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे (भंडारा) भव्य आयोजन करण्यात आले होते. हजारो भक्तांनी अत्यंत शिस्तीत या महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी उपस्थित भाविकांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आध्यात्मिक आनंद आणि उत्साह ओसंडून वाहत होता.
या भव्य आणि व्यापक धार्मिक सोहळ्याचे अचूक नियोजन करण्यासाठी व तो यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्रातील विविध भागांतील प्रमुख सेवेकरी आणि संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. श्री जयंत सुरेशराव वानखडे (खामगाव/अमरावती), श्री गोकुळभाऊ शेगोकर (आकोट), श्री शंकरराव खवले (लोखोंडा), श्री शरदराव देवरणकर (अध्यक्ष, शैव गुरव हितकारणी मंडळ, अमरावती), श्री जयंत पुसदकर (अध्यक्ष, निळकंठेश्वर संस्था, अमरावती), श्री भालचंद्रराव कथलकर (अंतरगाव गुरव), श्री राजूभाऊ कथलकर, श्री अशोकराव भारसाकळे, श्री प्रशांतभाऊ देशमुख, श्री परशरामभाऊ डोरस, श्री पुरुषोत्तमराव खंडार, श्री सुरेशराव रोहनकर, श्री कैलासराव डांगे, श्री शुभमराव पुसतकर, श्री ओमभाऊ मोरे, श्री मोहनराव पंडीत, श्री दिपकराव राजनकर, श्री संतोषराव दुत्तोंडे, श्री अशोक आगरकर, श्री चंद्रकांतराव पुसदकर, श्री दत्ताभाऊ कापसे, श्री सचिनराव चौधरी, श्री गणेशराव भांडे, श्री सचिनराव आरोकर, श्री संदीप राजूरकर, श्री हरिहरराव तांबस्कर, श्री प्रभाकर शेगोकर, श्री महेंद्रपाटील कथलकर, श्रीरामशंकर जयस्वाल, श्री दिलीपभाऊ बेलबागकर, श्री गोपालभाऊ चिखलकर, श्री मनोजराव तायडे, श्री राजूभाऊ पुसतकर, श्री दत्ताभाऊ शिंदे, श्री अनिल निहाटकर, श्री नारायणराव डांडगे, अजय राव वाघमारे, जयेंद्रपाटील, बंडूपंत मोरे आणि सतीशराव पांडे यांच्यासह विविध देवस्थान आणि सामाजिक संस्थांच्या सेवेकऱ्यांनी व स्वयंसेवकांनी मोलाचे योगदान दिले.
पारायण सोहळ्याच्या सांगतेनंतर मुख्य आयोजक जयंत सुरेशराव वानखडे (अमरावती) यांनी सर्व भाविकांशी संवाद साधला. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे मदत करणाऱ्या सर्व सेवाधारी बांधवांचे, अहोरात्र राबणाऱ्या कार्यकर्त्यांचे, सर्व दानशूर भक्तांचे आणि विशेषतः वृत्तपत्र व मीडिया क्षेत्रातील सर्व पत्रकार बंधूंचे आभार मानले. पत्रकारांनी वेळोवेळी श्री परमहंस परशराम महाराजांच्या समाजप्रबोधनपर कार्याचा आणि विचारांचा प्रचार-प्रसार समाजात अत्यंत प्रभावीपणे केल्याबद्दल त्यांचा विशेष कृतज्ञतापूर्वक गौरव करण्यात आला.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


