news
पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारू प्रकरणातील पीडितांना ‘अण्णासाहेब बनसोडे युवा मंचा’चा भक्कम आधार; विधानसभा उपाध्यक्ष तथा आमदार अण्णा बनसोडे यांनी फुंकरले दुःख!नगरसेवक श्री. बाबासाहेब ज्ञानोबा त्रिभुवन यांच्या पाठपुराव्याला यश; गजानन नगर व ABC कॉलनीतील वीज समस्या सुटली!चऱ्होली बुद्रुक येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला पालकांचा उदंड प्रतिसाद; २५० हून अधिक बालकांना सुरक्षा कवच!अमरावतीत राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा जागर; ‘अंनिस’ शहर शाखेच्या अध्यक्षपदी मिलिंद तायडे!शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर कडून अमरावती विभागात शाळांचा आढावा; शिल्लक निधीतून अभ्यासिका व संगणक सुविधा उभारण्याचे निर्देश!
Home अमरावती शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर कडून अमरावती विभागात शाळांचा आढावा; शिल्लक निधीतून अभ्यासिका व संगणक सुविधा उभारण्याचे निर्देश!

शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर कडून अमरावती विभागात शाळांचा आढावा; शिल्लक निधीतून अभ्यासिका व संगणक सुविधा उभारण्याचे निर्देश!

नियोजित 'डॉ. पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुला'च्या जागेची प्रत्यक्ष पाहणी; आमदार संजय घोडके, आमदार सुलभा खोडके व महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या उपस्थितीत हिवाळी अधिवेशनात भव्य निधी देण्याची घोषणा | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

आदर्श शाळांच्या निधीचा पूर्ण उपयोग करून विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार सुविधा उभारा; राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांचे निर्देश

 

 

अमरावती प्रतिनिधी अविनाश वानखेडे , २८ जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

अमरावती: जिल्ह्यातील आदर्श शाळांसाठी शासनस्तरावर मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. इमारतींचे बांधकाम कमी किमतीत झाले असले, तरी शाळांमधील इतर आवश्यक सुविधांसाठी हा निधी उपयोगात आणता येणार आहे. यासाठी प्रशासनाने तातडीने शासनाकडे प्रस्ताव पाठवून मान्यता घ्यावी आणि उर्वरित निधी विद्यार्थ्यांच्या सोयी-सुविधांसाठी उपयोगात आणावा, अशा स्पष्ट सूचना शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आज दिल्या.

डॉ. पंकज भोयर यांनी आज अमरावती येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या कार्यालयाला भेट देऊन विभागातील ‘पीएमश्री’, ‘सीएमश्री’ आणि आदर्श शाळांच्या कामांचा सविस्तर आढावा घेतला, त्याप्रसंगी ते बोलत होते. या महत्त्वाच्या बैठकीला शिक्षण उपसंचालक नीलिमा टाके, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख, सहाय्यक शिक्षण संचालक अमोल पवार आदी अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

बैठकीत बोलताना डॉ. भोयर म्हणाले की, विभागातील काही मोजक्याच आदर्श शाळांचे बांधकाम अद्याप पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे ज्या शाळांचे काम प्रगतीपथावर आहे, ते काम तातडीने पूर्ण करण्यात यावे. शाळा बांधकामांमध्ये कमी किमतीच्या निविदा प्राप्त झाल्यामुळे निधीमध्ये मोठी बचत झाली आहे. हा शिल्लक निधी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी उपयोगात आणणे शक्य आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने प्रस्ताव तयार करून इतर उपयुक्त सुविधा निर्माण कराव्यात. या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आवश्यक असणारी अभ्यासिका आणि संगणक सुविधा यांसारखे प्रकल्प उभारण्यात यावेत.

शासकीय शाळांमध्ये स्वच्छतेचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यामुळे आदर्श शाळांचे बांधकाम करताना आणि पुढील काळातही स्वच्छतेची विशेष काळजी राखली जाईल, यासाठी काटेकोर प्रयत्न करावेत. आदर्श शाळा या खऱ्या अर्थाने आदर्श व्हाव्यात, यासाठी आवश्यकता भासल्यास जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) निधीतून अतिरिक्त निधीची मागणी करण्यात यावी, असे सांगतानाच त्यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांमधील स्वच्छतागृहांचा आढावा घेऊन तेथे उत्तम सुविधा निर्माण करण्याचे आदेश दिले.

आढावा बैठकीनंतर राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी मालटेकडी रोडवरील नियोजित ‘डॉ. पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुल’ च्या जागेची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणी दौऱ्यादरम्यान आमदार संजय घोडके, आमदार सुलभा खोडके, महापौर श्रीचंद तेजवानी आदी लोकप्रतिनिधी व मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. भोयर म्हणाले की, या संकुलाची इमारत अत्यंत भव्यदिव्य असावी, तसेच या ठिकाणी सुसज्ज कॉन्फरन्स रूम आणि विद्यार्थ्यांसाठी आधुनिक अभ्यासिका निर्माण करण्यात यावी. सद्यस्थितीत तेथील शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवासस्थान बांधकामाबाबत पुनर्विचार करण्यात यावा. या संकुलाची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात झालेली असल्याने, या संदर्भातील सर्व आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण कराव्यात. जेणेकरून आगामी डिसेंबर महिन्यात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात या संकुलासाठी मोठ्या निधीची तरतूद करणे सोयीचे होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!