मोशी दुर्घटना ही मानवनिर्मित नसून ‘पुनावळे’ कचरा डेपोच्या राजकीय विरोधाचे फलित! नागरिक हक्क गाजवतात, मग कर्तव्याची जबाबदारी का झटकतात? – सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांचा थेट व रोखठोक सवाल
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, १० जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या आणि झपाट्याने होणारे शहरीकरण पाहता नागरी कचऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. बुधवार, दिनांक ८ जुलै २०२६ रोजी मोशी कचरा डेपो येथील ‘वेस्ट-टू-एनर्जी’ (Waste-to-Energy) प्रकल्पाच्या इमारतीवर कचऱ्याचा ढीग कोसळून झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मात्र, “शहरात नियोजित असलेला पुनावळे येथील कचरा डेपो उभा राहिला असता, तर मोशी येथील प्रकल्पावर अतिरिक्त ताण न आल्यामुळे ही दुर्घटना कधीच घडली नसती,” असा कायदेशीर व प्रशासकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण आणि वस्तुनिष्ठ खुलासा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे सत्तारूढ पक्षनेते श्री. प्रशांत शितोळे यांनी केला आहे.
या दुर्घटनेनंतर विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या राजकीय चिखलफेकीला उत्तर देताना पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली. या कायदेशीर आणि वस्तुनिष्ठ मांडणीमुळे त्यांची प्रशासकीय दूरदृष्टी असणारे नेते म्हणून प्रतिमा अधिक गडद झाली आहे.
भारतीय राज्यघटनेने नागरिकांना मूलभूत अधिकार दिले आहेत, मात्र त्याच संविधानाने नागरिकांवर काही मूलभूत कर्तव्ये आणि सामूहिक जबाबदाऱ्याही सोपवल्या आहेत, याची आठवण शितोळे यांनी करून दिली. ते अत्यंत सडेतोडपणे म्हणाले,
“सध्या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांची आणि विरोधकांची मानसिकता ‘कचरा सर्वांना करायचा आहे, परंतु तो आपल्या दारात नको’ अशी झाली आहे. केवळ नागरी हक्कांवर बोलणे आणि कर्तव्याची वेळ आली की जबाबदारी झटकणे, ही भूमिका योग्य नाही. प्रशासनाची जबाबदारी कचरा व्यवस्थापनाची असली, तरी त्याला लोकसहभागाची आणि सहकार्याची जोड मिळणे तितकेच घटनात्मक कर्तव्य आहे.”
काही वर्षांपूर्वी महापालिका प्रशासनाच्या वतीने दूरगामी विचार करून पुनावळे येथे नियोजित कचरा डेपोचा अत्याधुनिक प्रकल्प उभारण्याचा कायदेशीर प्रयत्न झाला होता. मात्र, “कचरा डेपो आमच्या भागात नको” अशी संकुचित भूमिका घेत राजकीय पक्षांनी, संघटनांनी आणि स्थानिक नागरिकांनी पुनावळे प्रकल्पाला तीव्र विरोध केला.अशी भुमिका अनेक राजकीय पक्षांनी देखील घेतली.असे प्रकल्प शहराच्या चार भागात असावा.
या स्थगितीच्या दरम्यानच्या काळात मोशी येथे ‘वेस्ट-टू-एनर्जी’ प्रकल्प सुरू करण्यात आला. मात्र, मागील ३०-३२ वर्षांचा साठलेला जुना कचरा आणि दैनंदिन प्रक्रियेनंतर शिल्लक राहिलेला कचरा यामुळे मोशी येथे कचऱ्याचा अवाढव्य डोंगर तयार झाला. गेल्या चार-पाच दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या धुवाधार आणि अभूतपूर्व मुसळधार पावसामुळे या कचऱ्याच्या डोंगराचा भाग घसरून थेट इमारतीवर कोसळला आणि ही दुर्घटना घडली. जर शहराच्या चार भागात वेळेत विकेंद्रीकरण झाले असते, तर मोशीवर हा भार पडलाच नसता, असे शितोळे यांनी सप्रमाण सिद्ध केले.
पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या आता ३२ लाखांच्या पुढे गेली आहे. हे वाढते शहरीकरण लक्षात घेता भविष्यात अशी दुर्घटना कधीही घडू नये, यासाठी पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी प्रशासकीय व धोरणात्मक उपाययोजना जाहीर केली आहे.भविष्यात शहराचा संपूर्ण कचरा एकाच ठिकाणी साठवून न ठेवता त्याचे क्षेत्रनिहाय विभाजन केले जाईल. महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व १० प्रभाग समित्यांच्या कार्यक्षेत्रात (१० प्रभागांमध्ये) स्वतंत्रपणे कचऱ्यावर प्रक्रिया करणारे ‘१० लहान वेस्ट-टू-एनर्जी’ सारखे अत्याधुनिक प्रकल्प राबवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. या प्रभागनिहाय प्रकल्पांमुळे कचऱ्याची वाहतूक कमी होईल आणि एकाच जागेवर कचऱ्याचे डोंगर तयार होणार नाहीत. या प्रकल्पांसाठी महापालिका प्रशासन लवकरच जागा निश्चिती आणि तांत्रिक आराखडा तयार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मोशी कचरा डेपो दुर्घटनेमध्ये दुर्दैवाने एका कर्मचाऱ्याला गंभीर दुखापत व मृत्यू ही झाला आहे. यासाठी वतीने ईश्वरचरणी भावपूर्ण प्रार्थना करण्यात आली आहे.
सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी मांडलेल्या या रोखठोक, संविधानात्मक आणि प्रशासकीय भाषेतील भूमिकेमुळे, केवळ दोषारोप न करता शहराला कायमस्वरूपी सुवर्णमध्य साधणारा धोरणात्मक पर्याय देणारा नेता, म्हणून त्यांचे कौतुक केले जात आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
