news
“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ“७ मार्चच्या जबरी चोरीचा छडा, सोन्याचे मिनी गंठण जप्त!” हिंजवडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; फरार साथीदार विशाल काळेचा शोध सुरू, परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या टोळीला चाप
Home मावळमहाराष्ट्र घरोघरी ज्ञानेश्वरी! एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मोफत ग्रंथवाटप!

घरोघरी ज्ञानेश्वरी! एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मोफत ग्रंथवाटप!

आळंदीत ज्ञानेश्वरी पारायण सोहळा; मंत्री भरत गोगावले यांची मोठी घोषणा!

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

घरोघरी ज्ञानेश्वरी! एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मोफत ग्रंथवाटप!

आळंदी येथे संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जन्मोत्सवी वर्षानिमित्त सुरू असलेल्या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या उद्घाटनदिनी एक मोठी घोषणा करण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक घरात मोफत ज्ञानेश्वरी ग्रंथवाटप करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी दिली. यामुळे राज्यातील लाखो भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

एकनाथ शिंदे यांच्या वारकऱ्यांप्रती निष्ठेचं दर्शन:

मंत्री भरत गोगावले यांनी या वेळी बोलताना सांगितले की, “घरात बसणाऱ्यांपेक्षा हिंदुत्वाचा विचार घेऊन जनतेत उतरलेल्या एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्यासोबत जाणे हेच योग्य ठरतं. त्यांचं संतविचारांवर निष्ठा आणि वारकऱ्यांप्रती प्रेम आहे.” उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आणि शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या माध्यमातून राज्यभर मोफत ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाटप करण्यात येणार आहे.

आळंदी पारायण सोहळ्यासाठी २ कोटींचा निधी:

राज्य सरकारकडून एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने आळंदी पारायण सोहळ्यासाठी २ कोटी रुपयांचा विशेष निधी देण्यात आला आहे. यामुळे सोहळ्यास भाविकांसाठी प्रशस्त व्यवस्था, नागरी सेवा सुविधा, मंडप व्यवस्था, पर्यायांनी प्रती मोफत देण्यात आल्या आहेत. रायगडसारख्या शिवस्मारकांनाही वारकऱ्यांनी दर्शनासाठी अवश्य भेट द्यावी, असे आवाहन मंत्री गोगावले यांनी केले.

उद्घाटन सोहळ्यातील उपस्थित मान्यवर:

उद्घाटन सोहळ्यात आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, अॅड. राजेंद्र उमाप, चैतन्य महाराज कबीर, पुरुषोत्तम महाराज पाटील, भगवान पोखरकर, राहुल चव्हाण, प्रकाश काळे, रोहिदास कदम आदी मान्यवर उपस्थित होते. तत्पूर्वी अखंड हरीनाम सप्ताहात बापूसाहेब मोरे यांची सुश्राव्य कीर्तन सेवा रुजू झाली. त्यानंतर आळंदी ग्रामस्थांच्या वतीने अन्नदान सेवा महाप्रसाद वाटप झाला. ज्ञानेश्वरी पारायणासह कीर्तनास भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण:

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून राज्यभर मोफत ज्ञानेश्वरी ग्रंथवाटप होणार असल्याच्या घोषणेमुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या उपक्रमामुळे संत ज्ञानेश्वर माऊलींचे विचार घरोघरी पोहोचण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

तुमचे या उपक्रमाबद्दल काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की कळवा!

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!