मोहोळ (सोलापूर) [मॅक्स मंथन डेली न्यूज] प्रतिनिधी पंडित गवळी : सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मोहोळ तालुक्यातील येणकी, मिरी, अरबळी या गावांना गावभेट दौऱ्यादरम्यान भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच, अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला.
खासदार शिंदे यांनी नागरिकांची निवेदने स्वीकारून त्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले. तसेच, अवकाळी पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतीचे मोठे नुकसान झाल्याने त्यांनी मोहोळ तालुक्यातील येवती आणि पापरी या गावातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आणि शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

या दौऱ्यादरम्यान, खासदार प्रणिती शिंदे यांच्या खासदार निधीतून येणकी मिरी वडापूर रस्त्याच्या खडीकरण आणि डांबरीकरणासाठी मंजूर झालेल्या १५,८८,६८९/- रुपयांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी मोहोळ तालुका अध्यक्ष सुलेमान तांबोळी, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष राजेश अप्पा पवार, संदीप पाटील, अनुसूचित जाती विभाग जिल्हा अध्यक्ष ॲड. मयूर खरात, सरपंच नौशाद पाटील, जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस आरिफ पठाण, उपसरपंच दत्तात्रय राऊत, आकाश खरात, रफिक पाटील, विनायक चोरगे, नितीन शिंदे, आबासाहेब जगदाळे, अप्पासाहेब पाटील, सीताराम जाधव, बिरप्पा काळे, उत्तम तडसरे, शबाना पाटील, राहुल पाटील, कुंडलिक तोडकर, दीपक जाधव, शुभम बाबर, नारायण गुंड, श्रीपती खरात, हणमंतू सरवदे, अप्पा पाटील, कुबेर गायकवाड, पुजारी सर, कोठे मॅडम, काशिद सर यांच्यासह अनेक पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला आणि युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खासदार प्रणिती शिंदे यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळवून देण्याची मागणी केली आहे.
