news
चऱ्होलीतील मनपा शाळेत चिमुकल्यांचा मनमोहक ‘योगोत्सव’; रंजक खेळांतून बालवाडीच्या विद्यार्थ्यांनी गिरवले आरोग्याचे धडे!मनपा मुख्यालयासमोरच मृत्यूचा सापळा! मुंबई-पुणे हायवेवरील तुटलेल्या ड्रेनेज चेंबरवरून प्रदीप गायकवाड कडाडलेपिंपरी-चिंचवड मनपाच्या ५ हजार कंत्राटी कामगारांना मोठा दिलासा! ग्रॅच्युइटी आणि बोनससाठी यशवंतभाऊ भोसले यांचे ‘एस्क्रो अकाऊंट’ मॉडेल यशस्वी६ खासदारांच्या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! उद्धव ठाकरेंचे भावनिक आवाहन तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ‘पिक्चर अभी बाकी’चा सज्जड इशारापिंपरी-चिंचवडचे भूषण: अंकुश जाधव यांना राज्य सरकारचा प्रतिष्ठेचा ‘विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार’ घोषित!
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवडच्या विकासाला गती! स्थायी समितीकडून कोट्यवधींच्या कामांना मंजुरी!

पिंपरी-चिंचवडच्या विकासाला गती! स्थायी समितीकडून कोट्यवधींच्या कामांना मंजुरी!

कॅन्सर हॉस्पिटल, उड्डाणपूल, पाणीपुरवठा योजना मार्गी; प्रशासक शेखर सिंह यांचा विकासकामांवर भर!

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी चिंचवड (मॅक्स मंथन डेली न्यूज)

स्थायी समितीच्या बैठकीत अनेक विकासकामांना प्रशासक शेखर सिंह यांची हिरवी झेंडी

पिंपरी, २२ मे २०२५ –
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात आज स्थायी समितीची बैठक प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, नगरसचिव चंद्रकांत इंदलकर यांच्यासह विविध विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. थेरगाव येथे १०० बेडेड मल्टी-स्पेशालिटी कॅन्सर रुग्णालय सार्वजनिक-खाजगी भागीदारीत सुरू करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. एकीकडे महागाईने सामान्य जनतेला पोखरत असताना, दुसरीकडे कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारावर आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा निर्णय आरोग्याच्या लढ्यात मैलाचा दगड ठरणार आहे.

तसेच क्रांतीवीर चापेकर स्मारक लोकार्पण, मिळकत कर संगणक प्रणाली दुरुस्ती, विविध प्रभागांतील पाईपलाईन व जलशुद्धीकरण कामे, डिजिटल क्लासरूमसाठी यंत्रणा खरेदी, जलनिकासीसाठी चेंबर दुरुस्ती व बांधकामे, आणि अनेक प्रलंबित नागरी कामांना देखील हिरवा कंदील देण्यात आला.

या बैठकीत प्रभाग ५ मधील राजमाता जिजाऊ उड्डाणपूल ते गंगोत्री पार्क रस्त्याचे बांधकाम, तसेच मोहन नगर, काळभोरनगर, आकुर्डी, दत्तवाडी, विवेकनगर आदी भागांतील ड्रेनेज कामे, रस्ते दुरुस्ती, जलवाहिन्यांचे सुधारणा कार्य, आणि हेल्थ केअर सिस्टीमच्या देखभाल व दुरुस्तीला मुदतवाढ देण्यासही मान्यता देण्यात आली.

सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारा एक महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे, युडीसीपीआर २०२० अंतर्गत विकास शुल्क व प्रशमन शुल्क दर आकारणीस मान्यता. तसेच शहराच्या ४०% भागात पाणी पुरवठा योजना राबविण्यासाठी जर शासनाकडून निधी मिळाला नाही, तर महानगरपालिकेच्या निधीतूनच हा खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला.

प्रशासक शेखर सिंह यांच्या दूरदृष्टीतून व निर्णयक्षमतेतून शहराच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. या बैठकीत जे निर्णय झाले, ते केवळ कागदावर नव्हे तर प्रत्यक्षात उतरणारे असतील, अशी अपेक्षा प्रत्येक पिंपरी-चिंचवडकर करू शकतो.


अजून बातम्या, मनाचा ठाव घेणारे विश्लेषण आणि नागरिकांच्या प्रश्नांची खरी उत्तरं मिळवा – फक्त मॅक्स मंथन डेली न्यूज वर

© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

 

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!