news
चऱ्होलीतील मनपा शाळेत चिमुकल्यांचा मनमोहक ‘योगोत्सव’; रंजक खेळांतून बालवाडीच्या विद्यार्थ्यांनी गिरवले आरोग्याचे धडे!मनपा मुख्यालयासमोरच मृत्यूचा सापळा! मुंबई-पुणे हायवेवरील तुटलेल्या ड्रेनेज चेंबरवरून प्रदीप गायकवाड कडाडलेपिंपरी-चिंचवड मनपाच्या ५ हजार कंत्राटी कामगारांना मोठा दिलासा! ग्रॅच्युइटी आणि बोनससाठी यशवंतभाऊ भोसले यांचे ‘एस्क्रो अकाऊंट’ मॉडेल यशस्वी६ खासदारांच्या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! उद्धव ठाकरेंचे भावनिक आवाहन तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ‘पिक्चर अभी बाकी’चा सज्जड इशारापिंपरी-चिंचवडचे भूषण: अंकुश जाधव यांना राज्य सरकारचा प्रतिष्ठेचा ‘विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार’ घोषित!
Home मावळमहाराष्ट्र अंत्री बुद्रुक: गोठ्यात विषारी मृत्यू! ९ गाई गमावलेल्या शेतकऱ्याची व्यथा!

अंत्री बुद्रुक: गोठ्यात विषारी मृत्यू! ९ गाई गमावलेल्या शेतकऱ्याची व्यथा!

घातपात की अपघात? सखोल चौकशीची मागणी!

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

अंत्री बुद्रुक: शेतकऱ्याच्या गोठ्यात विषबाधा! ९ गाईंचा हृदयद्रावक मृत्यू! (मॅक्स मंथन डेली न्यूज)

अंत्री बुद्रुक (मॅक्स मंथन डेली न्यूज) प्रतिनिधी पंडित गवळी

शिराळा तालुक्यातील अंत्री बुद्रुक या गावात आज एक अत्यंत दु:खद आणि संतापजनक घटना घडली. येथील प्रामाणिक आणि कष्टकरी शेतकरी दत्तात्रय मोरे यांच्या गोट्यातील 17 गाईंपैकी 9 गाईना सकाळी पशुखाद्य देण्यात आले. परंतु या पशुखाद्यात विष आढळल्यामुळे अवघ्या पंधरा-वीस मिनिटांत 9 निरागस, बिनदोष गाईंचा मृत्यू झाला.

गाभण असल्यामुळे वेगळे खाद्य दिलेल्या 8 गाई सुरक्षित आहेत, पण जे निरपराध प्राणी सकाळी खाद्य घेतले ते आता या जगात नाहीत. शेतकऱ्याचे दुःख शब्दात व्यक्त करता येणार नाही. त्यांच्या डोळ्यांसमोर त्या गाईंनी एक एक करत तडफडून मृत्यू पत्करला. हा केवळ एक अपघात नव्हता, तर शेतकऱ्याच्या जिवावर घाव होता.

गावात ही बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली आणि गावकऱ्यांनी गोट्यावर धाव घेतली. माजी मंत्री शिवाजीराव नाईक आणि विराज नाईक यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन शेतकऱ्यांचे सांत्वन केले.

या वेळी तहसीलदार श्यामला खोत, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, पंचायत समिती शिराळा येथील पशुसंवर्धन अधिकारी सतीश कुमार जाधव, विस्तार अधिकारी रवींद्र मटकरी, वारणा दूध संघाचे वर्धा अधिकारी एस. एन. खोत, डॉ. कैलास पोकळे, डॉ. दीपक पाटील यांनी तातडीने भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

तसेच गावातील सुनील पाटील, प्रताप चव्हाण, के. डी. पाटील, उपसरपंच राजेश चव्हाण, सरपंच सुजाता पाटील, उत्तम पाटील, प्रकाश पाटील, सुधीर कुंभार, जालिंदर मोरे, महादेव चव्हाण, विश्वास मोरे, आनंदा मोरे, शहाजी मोरे, शिवाजी चव्हाण आणि असंख्य गावकरी मोठ्या संख्येने गोट्यावर उपस्थित होते.

हा केवळ शेतकऱ्याच्या गाईंवरचा घाला नाही, तर संपूर्ण ग्रामीण जनतेच्या जीवशक्तीवरचा आघात आहे. ज्या गाईंच्या दूधावर, त्याच्या उत्पन्नावर एक शेतकरी आणि त्याचे कुटुंब जगत होते, त्या गाई आज कुणाच्याशा हलगर्जीपणामुळे मृत्यूमुखी पडल्या.

हा प्रकार कधी थांबणार? पशुखाद्य बनवणाऱ्या कंपन्यांवर कोण ठेवणार जबाबदारी?

शासनाने तात्काळ या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई केली पाहिजे. अन्यथा शेतकरी, जो आजही देशाच्या पोटाला अन्न पुरवतो, तो उद्या आपली आशा गमावून बसणार आहे.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!