news
चऱ्होलीतील मनपा शाळेत चिमुकल्यांचा मनमोहक ‘योगोत्सव’; रंजक खेळांतून बालवाडीच्या विद्यार्थ्यांनी गिरवले आरोग्याचे धडे!मनपा मुख्यालयासमोरच मृत्यूचा सापळा! मुंबई-पुणे हायवेवरील तुटलेल्या ड्रेनेज चेंबरवरून प्रदीप गायकवाड कडाडलेपिंपरी-चिंचवड मनपाच्या ५ हजार कंत्राटी कामगारांना मोठा दिलासा! ग्रॅच्युइटी आणि बोनससाठी यशवंतभाऊ भोसले यांचे ‘एस्क्रो अकाऊंट’ मॉडेल यशस्वी६ खासदारांच्या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! उद्धव ठाकरेंचे भावनिक आवाहन तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ‘पिक्चर अभी बाकी’चा सज्जड इशारापिंपरी-चिंचवडचे भूषण: अंकुश जाधव यांना राज्य सरकारचा प्रतिष्ठेचा ‘विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार’ घोषित!
Home पिंपरी चिंचवड वैष्णवी हागवणेंसाठी जिजाऊ ब्रिगेड आक्रमक! कठोर कारवाईची मागणी!

वैष्णवी हागवणेंसाठी जिजाऊ ब्रिगेड आक्रमक! कठोर कारवाईची मागणी!

मारहाणीचे वळ; केवळ आत्महत्या नव्हे, खुनाचा संशय!

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी (मॅक्स मंथन डेली न्यूज): वैष्णवी हागवणे मृत्यू प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जिजाऊ ब्रिगेडने केली आहे. वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीचे वळ आढळल्याने ही केवळ आत्महत्या नसून खून असण्याची शक्यता आहे, असा दावा करत जिजाऊ ब्रिगेडने पोलिसांकडे निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.

पुणे जिल्हा जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा मनिषा हेमबाडे, सचिव वृषाली साठे, उपाध्यक्षा शितल घरत आणि विभागीय अध्यक्षा सुनिता शिंदे यांनी आज पोलीस आयुक्तांना याबाबत निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, या प्रकरणात हुंडाबळी, खून आणि आत्महत्येस प्रवृत्त करणे यांसारखी कठोर कलमे लावून आरोपींवर गुन्हे दाखल करावेत.

जिजाऊ ब्रिगेडने वैष्णवीची जाऊ मयुरी हिच्या छळाचा मुद्दाही उपस्थित केला. मयुरीलाही सासरच्यांनी छळ करून घराबाहेर काढले असून, तिने यापूर्वीच महिला आयोग आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीकडे दुर्लक्ष करून कारवाई न करणाऱ्यांचीही चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जिजाऊ ब्रिगेडने केली आहे.

आयुक्तांच्या वतीने सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांनी हे निवेदन स्वीकारले. याप्रसंगी मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव, आबासाहेब ढवळे, अशोक सातपुते, वैभव जाधव आणि दत्तात्रय कांगळे उपस्थित होते. जिजाऊ ब्रिगेडच्या या मागणीमुळे वैष्णवी हागवणे प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळण्याची शक्यता आहे.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!