news
‘मुंडे साहेबांचे’ सामाजिक न्यायाचे कार्य प्रेरणादायी! रहाटणीच्या छत्रपती चौकात लोकनेत्याला वंदन‘अधिकाऱ्यांनीच नोंदणी करण्यास नकार द्यायला हवा होता!’ पार्थ पवार यांच्या कंपनीच्या जमीन व्यवहारावर अजित पवारांचे मोठे विधान‘बाबू गेनूं’चे शौर्य स्वातंत्र्य लढ्याला निर्णायक दिशा देणारे! वयाच्या २२ व्या वर्षी दिलेल्या बलिदानाला महापालिकेकडून अभिवादनगरजू नागरिकांना घराची मालकी मिळणार! अमरावतीत ५००० पेक्षा जास्त अतिक्रमणे नियमात; ‘प्रधानमंत्री आवास’ आणि ‘रमाई’ योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळाहिंजवडीत हॉटेल भाड्यावरून वाद पेटला! जयहिंद अर्बन बँकेचे संचालक अजिंक्य विनोदे यांच्यावर जीवघेणा हल्ला; सराईत आरोपी सुमित संदानशिवला जामीन नाकारला
Home मुख्यपृष्ठराष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय भारतात पुन्हा कोविडचा वाढता धोका! दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटकात रुग्ण वाढले!

भारतात पुन्हा कोविडचा वाढता धोका! दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटकात रुग्ण वाढले!

प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन; सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे आवाहन!

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

नवी दिल्ली (मॅक्स मंथन डेली न्यूज): देशात पुन्हा एकदा कोविड-१९ रुग्णांची संख्या वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. विशेषतः दिल्ली, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. प्रशासनाकडून या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे आणि नागरिकांना सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दिल्लीमध्ये आतापर्यंत २३ नवीन रुग्ण आढळले आहेत, ज्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्येही रुग्णसंख्येत वाढ नोंदवण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात सध्या २५७ सक्रिय रुग्ण आहेत आणि यापैकी बहुतेक सौम्य लक्षणे असलेले आहेत.

या पार्श्वभूमीवर, केंद्र आणि राज्य सरकारांनी नागरिकांना मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे आणि वेळोवेळी हात धुणे यासारख्या सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. आरोग्य यंत्रणा सज्ज असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!