news
“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ“७ मार्चच्या जबरी चोरीचा छडा, सोन्याचे मिनी गंठण जप्त!” हिंजवडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; फरार साथीदार विशाल काळेचा शोध सुरू, परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या टोळीला चाप
Home पिंपरी चिंचवड महापालिकेच्या लेकींनी मुंबई गाजवली! टाकाऊ वस्तूंमधून साकारलेल्या कलेला महाराष्ट्रातून पहिला बहुमान

महापालिकेच्या लेकींनी मुंबई गाजवली! टाकाऊ वस्तूंमधून साकारलेल्या कलेला महाराष्ट्रातून पहिला बहुमान

चिल्ड्रन्स इन्स्टॉलेशन विभागात थेरगाव शाळेने मारली बाजी; खाजगी शाळांना मागे टाकत पटकावला सुवर्ण यश. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

मुंबईच्या ‘काळा घोडा फेस्टिव्हल’मध्ये पिंपरी-चिंचवडचा डंका; थेरगाव मनपा शाळेच्या कलाकृतीला प्रथम क्रमांक


पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, ३ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी/मुंबई : आशियातील सर्वात मोठ्या सांस्कृतिक महोत्सवांपैकी एक असलेल्या मुंबईतील प्रतिष्ठित ‘काळा घोडा आर्ट फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शाळेने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. चिल्ड्रन्स इन्स्टॉलेशन विभागात थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण प्राथमिक कन्या शाळेने सादर केलेल्या “मानवी विचारांचे रोलरकोस्टर” या कलाकृतीला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच महापालिकेच्या शाळेने हा बहुमान पटकावला आहे.

थेरगाव शाळेतील विद्यार्थिनींनी टाकाऊ वस्तूंचा (वेस्ट मटेरियल) वापर करून मानवी मनाची गुंतागुंत मांडली. यामध्ये:

  • सायकलचे चाक व घोडा: मानवी विचारांची ऊर्जा आणि इच्छाशक्तीचे प्रतीक.

  • दोरी पकडलेली मुलगी: आत्मसंयम आणि विवेकाचे दर्शन.

  • कलात्मक मांडणी: जीवनातील संघर्ष, मानसिक चढ-उतार आणि अनुभवांना योग्य दिशा देण्याचा संदेश देणारी त्रिमितीय रचना.

    परीक्षकांनी या कल्पकतेचे आणि पर्यावरणपूरक दृष्टिकोनाचे विशेष कौतुक केले.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, उपायुक्त ममता शिंदे आणि प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सहभाग नोंदवण्यात आला होता. कला शिक्षिका मुक्ता पुसाळकर-धोंगडे यांनी या इन्स्टॉलेशनची संकल्पना साकारली, त्यांना स्वाती मदने व दिपाली नवले यांनी सहकार्य केले.

सहभागी विद्यार्थिनी: सानिका पवार, श्रावणी महापुरे, दिपाली पांडगुळे, अनुजा टोमके, प्रिया होळकर, हुमेरा शेख, यशोदा राठोड, किशोरी वाबळे आणि समिक्षा डींगरे.

“महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत प्रथम येणे ही अभिमानास्पद बाब आहे. योग्य संधी मिळाल्यास आमचे विद्यार्थी खाजगी शाळांनाही मागे टाकू शकतात हे सिद्ध झाले आहे.”

– विक्रांत बगाडे, अतिरिक्त आयुक्त, PCMC

“हा विजय ऐतिहासिक आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेने आणि पर्यावरणपूरक कलेने सर्वांची मने जिंकली आहेत.”

– ममता शिंदे, उपायुक्त, PCMC

या यशाबद्दल मुख्याध्यापक शिवाजी दौंडकर आणि सर्व शिक्षकांचे शहरातून कौतुक होत आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!