news
चऱ्होलीतील मनपा शाळेत चिमुकल्यांचा मनमोहक ‘योगोत्सव’; रंजक खेळांतून बालवाडीच्या विद्यार्थ्यांनी गिरवले आरोग्याचे धडे!मनपा मुख्यालयासमोरच मृत्यूचा सापळा! मुंबई-पुणे हायवेवरील तुटलेल्या ड्रेनेज चेंबरवरून प्रदीप गायकवाड कडाडलेपिंपरी-चिंचवड मनपाच्या ५ हजार कंत्राटी कामगारांना मोठा दिलासा! ग्रॅच्युइटी आणि बोनससाठी यशवंतभाऊ भोसले यांचे ‘एस्क्रो अकाऊंट’ मॉडेल यशस्वी६ खासदारांच्या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! उद्धव ठाकरेंचे भावनिक आवाहन तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ‘पिक्चर अभी बाकी’चा सज्जड इशारापिंपरी-चिंचवडचे भूषण: अंकुश जाधव यांना राज्य सरकारचा प्रतिष्ठेचा ‘विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार’ घोषित!
Home पिंपरी चिंचवड पिंपरीत नव्या धम्मविहाराचा मंगलमय प्रारंभ!

पिंपरीत नव्या धम्मविहाराचा मंगलमय प्रारंभ!

आमदार अमित गोरखेंच्या निधीतून साकारले आधुनिक सुविधांनी युक्त केंद्र.

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी (मॅक्स मंथन डेली न्यूज): पिंपरीत नव्याने साकारलेल्या धम्मानुस्मृती विहाराचे मंगलमय वातावरणात उद्घाटन! आमदार अमित गोरखेंचा महत्त्वपूर्ण निधी!

त्रिरत्न बौद्ध महासंघ, पिंपरी केंद्राच्या वतीने नव्याने सुसज्ज करण्यात आलेल्या धम्मानुस्मृती विहाराचा उद्घाटन सोहळा आज अत्यंत मंगलमय वातावरणात पार पडला. या धम्मविहाराच्या नूतनीकरणासाठी आवश्यक असलेला संपूर्ण निधी पिंपरीचे लोकप्रिय आमदार अमित गोरखे यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आला होता.

या धम्मविहाराची मूळ संकल्पना तब्बल ३३ वर्षांपूर्वी, म्हणजेच १९९२ मध्ये मांडण्यात आली होती. आता, तीन दशकांहून अधिक काळानंतर, या विहाराला नवीन रूप देण्यात आले आहे. आधुनिक सुविधांनी परिपूर्ण असा हा धम्मविहार पुन्हा एकदा समाजाच्या आध्यात्मिक आणि सामाजिक विकासासाठी सज्ज झाला आहे.

उद्घाटन सोहळ्याला धम्मप्रिय बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उपस्थितांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि समाधान पाहून आमदार अमित गोरखे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, हा उपक्रम समाजासाठी निश्चितच अत्यंत फलदायी ठरेल.

याप्रसंगी बोलताना आमदार अमित गोरखे म्हणाले, “हे केवळ एक विकासकाम नाही, तर धम्मासाठी असलेले माझे सामाजिक कर्तव्य आहे.” त्यांनी धम्मविहाराच्या माध्यमातून भावी पिढीला बौद्धिक प्रबोधन, नैतिक शिक्षण आणि समतेच्या मूल्यांची शिकवण देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य अखंडपणे सुरू राहील, अशी सदिच्छा व्यक्त केली.

या नवीन धम्मविहारामुळे पिंपरी आणि परिसरातील बौद्ध अनुयायांना एकत्र येऊन धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. आधुनिक सोयीसुविधांमुळे या विहाराचे महत्त्व अधिक वाढले आहे, यात शंका नाही.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!