news
चऱ्होलीतील मनपा शाळेत चिमुकल्यांचा मनमोहक ‘योगोत्सव’; रंजक खेळांतून बालवाडीच्या विद्यार्थ्यांनी गिरवले आरोग्याचे धडे!मनपा मुख्यालयासमोरच मृत्यूचा सापळा! मुंबई-पुणे हायवेवरील तुटलेल्या ड्रेनेज चेंबरवरून प्रदीप गायकवाड कडाडलेपिंपरी-चिंचवड मनपाच्या ५ हजार कंत्राटी कामगारांना मोठा दिलासा! ग्रॅच्युइटी आणि बोनससाठी यशवंतभाऊ भोसले यांचे ‘एस्क्रो अकाऊंट’ मॉडेल यशस्वी६ खासदारांच्या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! उद्धव ठाकरेंचे भावनिक आवाहन तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ‘पिक्चर अभी बाकी’चा सज्जड इशारापिंपरी-चिंचवडचे भूषण: अंकुश जाधव यांना राज्य सरकारचा प्रतिष्ठेचा ‘विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार’ घोषित!
Home मावळमहाराष्ट्र लातूरमध्ये पांचाळ सुतार समाजाची महत्त्वपूर्ण बैठक!

लातूरमध्ये पांचाळ सुतार समाजाची महत्त्वपूर्ण बैठक!

शासकीय योजना, वधूवर नोंदणी आणि विश्वकर्मा पी.एम. योजनेवर मार्गदर्शन.

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

लातूर (मॅक्स मंथन डेली न्यूज): लातूरमध्ये पांचाळ सुतार समाजाच्या बैठकीचे आयोजन! शासकीय योजनांची माहिती मिळणार!

लातूर येथे पांचाळ सुतार समाजाच्या महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक रविवार, दिनांक १ जून २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता विश्वकर्मा देवस्थान समिती मंदिर, उड्डाण पूल, बार्शी रोड येथे होणार आहे.

या बैठकीमध्ये समाजासाठी असलेल्या काही महत्त्वाच्या योजनांवर चर्चा केली जाणार आहे. खालील प्रमुख मुद्द्यांवर मार्गदर्शन केले जाईल:

  • श्री संत भोजलिंग काका आर्थिक विकास महामंडळाच्या अर्जांविषयी आणि विविध योजनांविषयी माहिती.
  • एक रुपयात वधूवर नोंदणीची सोय.
  • विश्वकर्मा पी.एम. योजना.
  • इतर मागास प्रवर्गासाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनांची माहिती.

या बैठकीसाठी संत भोजलिंग काका सुतार समाज आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र शासनाच्या समन्वय समितीचे विद्यानंद माणिकराव मानकर सर (मुख्य प्रशासकीय तथा राज्य समन्वयक), विश्वकर्मा क्रांती दलाचे अध्यक्ष श्री बाळासाहेब पांचाळ, पिंपरी चिंचवड शहराचे समन्वयक श्री लहू सुतार सर, पिंपरी चिंचवड शहराचे समन्वयक श्री तात्याराव पांचाळ आणि इतर मान्यवर अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.

या बैठकीमध्ये समन्वय समिती जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर स्थापन करून त्यांना नियुक्ती पत्रे दिली जातील. तसेच, जास्तीत जास्त समाज बांधवांना या योजनांचा लाभ कसा घेता येईल, याबद्दल मार्गदर्शन केले जाणार आहे.

तरी, सर्व समाज बांधवांना या महत्त्वपूर्ण बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

बैठकीची माहिती:

  • वार: रविवार
  • दिनांक: ०१ जून २०२५
  • वेळ: सकाळी ११.०० वाजता
  • स्थळ: विश्वकर्मा मंदिर देवस्थान समिती, बार्शी रोड, विश्वकर्मा गार्डन फंक्शन हॉलच्या बाजूस, लातूर.

अधिक माहितीसाठी श्री बळवंतराव पांचाळ सर (विभागीय समन्वयक, विश्वकर्मा समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य) यांच्याशी +91 94213 67927 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!