news
“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ“७ मार्चच्या जबरी चोरीचा छडा, सोन्याचे मिनी गंठण जप्त!” हिंजवडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; फरार साथीदार विशाल काळेचा शोध सुरू, परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या टोळीला चाप
Home मावळमहाराष्ट्र मूर्तिजापुरात महिला स्वच्छतागृहांचा दुष्काळ!

मूर्तिजापुरात महिला स्वच्छतागृहांचा दुष्काळ!

मूलभूत सुविधेसाठी महिलांची प्रतीक्षा; नगर परिषदेची उदासीनता कायम.

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

मूर्तिजापूर (विलास सावळे, मॅक्स मंथन विशेष): महिलांसाठी स्वच्छतागृहाचा अभाव! मूलभूत सुविधेसाठी महिलांची प्रतीक्षा; नगर परिषदेची उदासीनता!

मूर्तिजापूर शहरातील महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मूलभूत गरज दुर्लक्षित आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी, जिथे दररोज हजारो महिला खरेदीसाठी आणि इतर कामांसाठी येतात, तिथे महिलांसाठी एकही सार्वजनिक स्वच्छतागृह उपलब्ध नाही!

शहरातील बाजारपेठ आणि शॉपिंग सेंटर्समध्ये पंचक्रोशीतून महिलांची मोठी गर्दी असते. भाजीपाला विक्रेत्या महिलांपासून ते खरेदीसाठी आलेल्यांपर्यंत, प्रत्येकाला स्वच्छतागृहाची गरज भासते. मात्र, खेदाची बाब म्हणजे, शहरातील प्रमुख गल्ल्या आणि बोळ्यांमध्ये महिलांसाठी एकही प्रसाधनगृह नाही. अनेक महिला भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात, परंतु स्वच्छतागृहाअभावी त्यांची मोठी कुचंबना होते.

गेली १५ ते २० वर्षे उलटून गेली, तरी नगर परिषद प्रशासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष दिलेले नाही, असा आरोप महिलांनी केला आहे. बसस्थानकाव्यतिरिक्त शहरात इतरत्र कुठेही महिलांसाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही. काही सार्वजनिक शौचालये शहराच्या बाहेरच्या बाजूला आहेत, जिथे महिलांना जाणे सोयीचे नसते.

बाहेरगावाहून व्यवसाय करण्यासाठी येणाऱ्या महिलांना तर याचा अधिक त्रास सहन करावा लागतो. महिलांसाठी स्वच्छतागृह ही त्यांची मूलभूत गरज आहे आणि त्यापासून त्यांना वंचित ठेवणे हा त्यांच्यावर अन्याय आहे, असे मत महिलांनी व्यक्त केले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी महिलांकडून होत आहे. शॉपिंग सेंटर्समध्ये पुन्हा अद्ययावत प्रसाधनगृहे उभारण्याची गरज महिलांनी जोरकसपणे मांडली आहे.

मूर्तिजापूर शहरातील या गंभीर समस्येबद्दल आपले काय विचार आहेत? कमेंटमध्ये नक्की कळवा!

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!