news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home पिंपरी चिंचवड आयुक्तांविरोधात राष्ट्रपतींकडे तक्रार! पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ!

आयुक्तांविरोधात राष्ट्रपतींकडे तक्रार! पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ!

नागरिकांना भेट टाळणे, भ्रष्टाचाराला पाठिशी घालण्याचा आरोप; निलेश नलावडेंचा गंभीर इशारा.

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड (मॅक्स मंथन डेली न्यूज): धक्कादायक खुलासा! आयुक्त शेखर सिंह यांच्या कार्यशैलीवर गंभीर प्रश्नचिन्ह! थेट राष्ट्रपतींकडे तक्रार!

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या कार्यशैलीवर आता थेट राष्ट्रपती भवनातून प्रश्न उठले आहेत! नेहरूनगर, पिंपरी येथील जागरूक नागरिक निलेश प्रकाश नलावडे यांनी आयुक्तांविरोधात अत्यंत गंभीर आरोप करत थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना तक्रार अर्ज पाठवला आहे, ज्यामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नलावडे यांनी आपल्या तक्रारीत स्पष्टपणे म्हटले आहे की, आयुक्त सिंह यांनी नागरिकांसाठी सोमवार, बुधवार आणि शुक्रवार हे भेटीचे दिवस जाहीर केले असले तरी, ही केवळ एक दिखाऊ बाब आहे. वेळेवर पोहोचलेल्या सामान्य नागरिकांना आयुक्तांकडून भेट नाकारली जाते, त्यांच्या समस्यांकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले जाते! इतकेच नव्हे, तर आयुक्तांच्या शासकीय मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागरिकांचे फोन उचलले जात नाहीत, उलट त्यांचे नंबर थेट ब्लॅकलिस्टमध्ये टाकले जातात, हा सामान्य नागरिकांचा अपमान नाही तर काय?, असा संतप्त सवाल नलावडे यांनी उपस्थित केला आहे.

निवडक कारवाईचा कांगावा! प्रभावशालींवर कृपादृष्टी?

प्रशासनाच्या ‘निवडक’ भूमिकेवर नलावडे यांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, प्रशासन केवळ काही ठराविक प्रकरणांवरच कारवाईचा देखावा करते, तोही केवळ प्रसिद्धीसाठी! इंद्रायणी नदीच्या पूररेषेतील अनधिकृत बंगल्यांवर झालेली कारवाई योग्य असली तरी, शहरातील इतर गंभीर अतिक्रमणे, जी राजकीय वरदहस्त असलेल्या व्यक्तींनी केली आहेत, त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. ही प्रशासनाची उघडउघड दुटप्पी भूमिका आहे, असा थेट आरोप त्यांनी केला आहे.

सामान्यांसाठी दरवाजे बंद, VIP साठी लाल कार्पेट!

तक्रार अर्जात आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. नलावडे यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, जेव्हा ठेकेदार, राजकीय नेते किंवा बिल्डर लॉबीचे सदस्य आयुक्तांना भेटायला जातात, तेव्हा त्यांना तत्काळ प्रवेश मिळतो. मात्र, आपल्या समस्या घेऊन येणाऱ्या सामान्य नागरिकांना कार्यालयाच्या दरवाज्यातच ताटकळत ठेवले जाते. हा थेट सामान्य माणसाच्या हक्कांचा आणि स्वाभिमानाचा अपमान आहे! या भेदभावामुळे प्रशासनातील पारदर्शकतेचा पूर्णपणे अभाव आणि सामान्य नागरिकांच्या समस्यांविषयीची घोर असंवेदनशीलता दिसून येते, असे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

आता राष्ट्रपती करणार चौकशी?

या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर निलेश नलावडे यांनी राष्ट्रपतींकडे मागणी केली आहे की, आयुक्त शेखर सिंह यांच्या कार्यशैलीची तातडीने निष्पक्ष चौकशी सुरू करावी. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाला खऱ्या अर्थाने पारदर्शक, जनतेला उत्तरदायी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले करण्यासाठी कठोर पाऊले उचलण्याची गरज आहे, असे त्यांनी आपल्या तक्रार अर्जात म्हटले आहे.

“सामान्य नागरिकांना भेटायला वेळ नाही, पण भ्रष्ट्राचारी आणि सत्ताधाऱ्यांशी हातमिळवणी करायला तत्पर! ही लोकशाहीची थट्टा आहे. राष्ट्रपती महोदयांनी यात हस्तक्षेप करून तातडीने चौकशीचे आदेश द्यावेत,” असे थेट आव्हान तक्रारदार निलेश प्रकाश नलावडे यांनी दिले आहे.

आयुक्त शेखर सिंह यांच्या या कथित कार्यशैलीबद्दल तुमचे काय मत आहे? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा आवाज नोंदवा!

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!