news
रहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुलपिंपरी-चिंचवडमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक करणारे आहेरकर कुटुंब नेवासामधून अटक! आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईजागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेतभारतातील म्युझिक इंडस्ट्रीला केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट; ‘PPL India’ ला मिळाली अधिकृत कॉपीराईट सोसायटी म्हणून मान्यता!मोरवाडीत पिंपरी-चिंचवड भाजपचा भव्य नियुक्ती सोहळा; भुजबळ, नेमाने, भालेराव, मोरे आणि शिर्के यांच्यावर नव्या आघाड्यांची जबाबदारी!
Home मुख्यपृष्ठ पवार साहेबांच्या विचारांचा ‘विस्तार’ करणार: वसंतनाना देशमुख यांचा निर्धार!

पवार साहेबांच्या विचारांचा ‘विस्तार’ करणार: वसंतनाना देशमुख यांचा निर्धार!

मंगळवेढ्यात जिल्हाध्यक्षपदाचा सत्कार; विजयसिंह मोहिते-पाटील आणि धैर्यशीलभैय्या मोहिते-पाटील यांच्या विचारांचे मार्गदर्शन, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण. (मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

वसंतनाना देशमुख यांचा जिल्हाध्यक्षपदी सत्कार: मंगळवेढ्यातून राष्ट्रवादीला बळकटी देण्याचा निर्धार!

प्रत्येक समाजघटकाला पक्षाशी जोडण्याचे उद्दिष्ट; पवार साहेबांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांशी संवाद

मंगळवेढा, प्रतिनिधी पंडित गवळी-१७ जून २०२५  (मॅक्स मंथन डेली न्यूज): राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाच्या मंगळवेढा तालुका

व शहर शाखेच्या वतीने नवनियुक्त जिल्हाध्यक्ष श्री. वसंतनाना देशमुख यांचा मंगळवेढ्यात भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासोबतच, वसंतनानांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या विस्तारासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठकही पार पडली, जिथे प्रत्येक समाजघटकाला पक्षाशी जोडण्यावर भर देण्याचे आवाहन करण्यात आले.


“कार्यकारिणी मोठी झाली तरी चालेल, पण सर्वांना पक्ष आपला वाटला पाहिजे!”

जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख यांनी पक्षाच्या विस्ताराबद्दल बोलताना स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले, “प्रत्येक समाजघटकाचा माणूस कार्यकारिणीत असला पाहिजे. कार्यकारिणी मोठी करावी लागली तरी चालेल, पण सर्व समाज घटकाला पक्ष आपला वाटला पाहिजे.” पवार साहेबांवर निष्ठा व्यक्त करणाऱ्या कार्यकर्त्यांशी त्यांनी यावेळी सविस्तर चर्चा केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ मर्यादित न ठेवता, पक्षाचा विस्तार करून पवार साहेबांचे धोरण राबवूया आणि जयंतराव पाटलांसारखी समविचारी पक्षाची बांधणी करूयात, अशा विविध प्रश्नांवर यावेळी विचारमंथन झाले.

प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मणराव ढोबळे यांनीही आपले विचार मांडले. यावेळी वसंतनाना देशमुख यांनी अत्यंत प्रभावी मार्गदर्शन केले. आदरणीय जिल्ह्याचे आणि राज्याचे नेते विजयसिंह मोहिते-पाटील साहेब यांच्या विचारांचे मार्गदर्शन आणि खासदार धैर्यशीलभैय्या मोहिते-पाटील साहेब यांच्या भूमिकेची माहिती त्यांनी कार्यकर्त्यांना समजावून सांगितली. या कार्यक्रमाला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.


मंगळवेढ्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती

या सत्कार समारंभाला आणि बैठकीला अनिल सावंत, राहुल शहा, मारुती वाकडे, चंद्रशेखर कोंडूभैरी, प्रथमेश पाटील, राजाभाऊ चेळेकर, संगीता कट्टे, स्मिता अवघडे, संतोष रणदिवे, माणिक गुंगे, जमीर इनामदार, अजिंक्य बेद्रे, पंडित गवळी, सागर गुरव, दादासाहेब पवार, सुरेश कट्टे, सैफन शेख, नानासाहेब करपे आणि इतर अनेक मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वसंतनाना देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्ष मंगळवेढा तालुक्यात अधिक मजबूत होईल, असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!