news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home मुख्यपृष्ठ मंगळवेढ्यात ‘धनश्री’ची भरारी: आंधळगावमध्ये अत्याधुनिक शाखेचे उद्घाटन!

मंगळवेढ्यात ‘धनश्री’ची भरारी: आंधळगावमध्ये अत्याधुनिक शाखेचे उद्घाटन!

राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि आमदार समाधान आवताडे यांच्या उपस्थितीत सोहळा; पारदर्शक कारभारावर आधारित यशाचे प्रतीक. (मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

धनश्री मल्टीस्टेट’च्या आंधळगाव शाखेच्या नूतन इमारतीचे दिमाखदार लोकार्पण!

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन; संस्थेच्या प्रगतीचा नवा अध्याय सुरू!

प्रतिनिधी पंडित गवळी, मंगळवेढा, १७ जून २०२५ (मॅक्स मंथन डेली न्यूज): सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव येथील ‘धनश्री मल्टीस्टेट को. ऑप. पतसंस्था मर्या.’ च्या आंधळगाव शाखेच्या भव्य नूतन इमारतीचे लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. राज्याचे सहकार मंत्री मा. श्री. बाबासाहेबजी पाटील यांच्या शुभहस्ते आणि स्थानिक आमदार श्री. समाधान आवताडे यांच्या अध्यक्षतेखाली हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. संस्थेच्या या नवीन आणि आधुनिक इमारतीमुळे धनश्री मल्टीस्टेटच्या प्रगतीचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे.


संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे सरांच्या दूरदृष्टीचे फलित

धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा. श्री. शिवाजीराव काळुंगे सर यांच्या दूरदृष्टीने आणि प्रभावी मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे व्हा. चेअरमन, सर्व संचालक मंडळ आणि सभासद यांच्या विश्वासाच्या जोरावर ही सुसज्ज, सुशोभित आणि आधुनिक इमारत उभी राहिली आहे. या नूतन इमारतीप्रमाणेच संस्थेचा पारदर्शक कारभार, ग्राहकांचा विश्वास आणि ठेवींचा सातत्याने वाढणारा आलेख ही संस्थेच्या यशाची पावती आहे. यावेळी संस्थेच्या यशस्वी वाटचालीकरता मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.


अनेक मान्यवरांची उपस्थिती

या दिमाखदार सोहळ्याला अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यामध्ये माजी आमदार श्री. राजनजी पाटील, माजी आमदार श्री. धनाजी साठे, धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा. श्री. शिवाजीराव काळुंगे सर, चेअरमन प्रा. श्री. शोभाताई काळुंगे, माजी प्राचार्य प्रा. श्री. येताळा भगत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सौ. राजलक्ष्मीताई काळुंगे-गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सहकार संघटनेचे प्रदेश सरचिटणीस श्री. राजेंद्र हजारे, श्री संत दामाजी शुगरचे चेअरमन श्री. शिवानंद पाटील, माजी संचालक श्री. पांडुरंग भाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सरचिटणीस श्री. लतीफभाई तांबोळी, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. शिवाजीराव नागणे, माजी नगराध्यक्ष श्री. प्रकाशआप्पा गायकवाड, माजी संचालक श्री. सुरेशआण्णा भाकरे, संचालक श्री. दिगंबर भाकरे, श्री. औदुंबर वाडदेकर, सरपंच श्री. लहुजी लेंडवे, श्री. प्रमोद लेंडवे, उपसरपंच श्री. सुयोग बनसोडे, सागर गुरव, प्रशांत माळी, विठ्ठल क्षीरसागर तसेच संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्याने आंधळगाव परिसरातील सहकार चळवळीला नवचैतन्य दिले आहे.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!