गणेश विसर्जनासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेची जय्यत तयारी
२७ विसर्जन घाटांवर जीव रक्षकांची नियुक्ती; सुरक्षिततेसाठी अग्निशमन विभागाचे विशेष नियोजन
२९ ऑगस्ट २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी, प्रतिनिधी शाम सोनवणे – पिंपरी-चिंचवड शहरात सुरू असलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महापालिकेने गणेश विसर्जन काळात विशेष तयारी केली आहे. शहराच्या २७ अधिकृत गणेश विसर्जन घाटांवर कोणत्याही प्रकारची दुर्घटना टाळण्यासाठी अग्निशमन दलाच्या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांसह जीव रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विसर्जन घाटांवर सुरक्षा व्यवस्था
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत प्रत्येक घाटावर आवश्यक असलेले साहित्य, जसे की लाईफ जॅकेट, लाईफ रिंग आणि दोरी उपलब्ध करून देण्यात आले आहे. जीव रक्षकांना अग्निशमन विभागाकडून विशेष ऍप्रन देण्यात आले आहेत, ज्यामुळे त्यांना सहज ओळखता येईल. तसेच, आपत्कालीन परिस्थितीसाठी अग्निशमन दलाची वाहने, रबर बोट आणि बचाव पथकेही घाटांवर सज्ज ठेवण्यात आली आहेत.
जीव रक्षक पथकांचे समन्वय अधिकारी
• किवळेगाव (पवनानदी), रावेत घाट (जलशुद्धीकरण केंद्र), रावेत भोंडेवस्ती (मळेकर) – अनिल डिंबळे – ७२६२०२३३२०
• पुनावळे गाव (राममंदिर), ताथवडे स्मशान घाट, वाल्हेकरवाडी जाधव घाट, प्राधिकरण तळे (गणेशतलाव) – गौतम इंगवले – ९२७०३१६३१६
• थेरगाव पूल नदीघाट, मोरया गोसावी पवना नदी, केशवनगर (चिंचवड घाट) – चंद्रशेखर घुळे – ९९२२२५७९८५
• पिंपरी स्मशानभूमी घाट, सुभाषनगर घाट, काळेवाडी स्मशान घाट – बाळासाहेब वैद्य – ९८२२७७४०४९
• काटेपिंपळे घाट, पिंपळे गुरव घाट, पिंपळे निळख घाट, वकड गावठाण घाट, कस्पटे वस्ती घाट – विजय घुगे – ८८८८८३७५४३
• सांगवी स्मशान घाट, सांगवी दशक्रिया घाट, सांगवी वेताळबाबा मंदिर घाट – सुनील फरांदे – ७३८१८१२७०१
• कासारवाडी स्मशानभूमी घाट, फुगेवाडी स्मशानभूमी घाट, बोपखेल घाट – दिलीप गायकवाड – ९७६७३०५३२४
• चिखली स्मशान घाट, मोशी नदीघाट – विनायक नाळे – ९३७०९१५५७६
• मोशी खाण (इ) प्रभाग – विकास नाईक – ९८५०८९०४०३
अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी सांगितले की, “गणेशोत्सव काळात नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले असून, प्रत्येक घाटावर आवश्यक ती सर्व उपकरणे आणि प्रशिक्षित पथके उपलब्ध आहेत.”
नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन
सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे यांनी नागरिकांना काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. त्यांनी आवाहन केले आहे की, नागरिकांनी मूर्ती विसर्जनासाठी नदीपात्रात उतरू नये, लहान मुलांना पाण्याजवळ एकटे सोडू नये आणि बचाव पथक व पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे. तसेच, मदतीची गरज भासल्यास त्वरित रेस्क्यू पथकाशी संपर्क साधावा.
महापालिकेने विसर्जन घाटांवर समन्वय अधिकाऱ्यांचीही नियुक्ती केली असून, त्यांची नावे व संपर्क क्रमांक जाहीर केले आहेत. यामुळे नागरिकांना कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत मिळणे शक्य होणार आहे.
© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
