news
Home पिंपरी चिंचवड ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’चा अनोखा अनुभव! पिंपरी चिंचवडमध्ये सांस्कृतिक महासंगम

‘एक भारत, श्रेष्ठ भारत’चा अनोखा अनुभव! पिंपरी चिंचवडमध्ये सांस्कृतिक महासंगम

देशातील २८ राज्यांच्या माती-पाण्याने वृक्षारोपण; परदेशी प्रतिनिधींच्या उपस्थितीत राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

२८ राज्ये आणि ३ देशांतील संस्कृतीचा संगम

 


 

पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रीय सांस्कृतिक महासंगम; १५ ते १७ सप्टेंबर दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन

 

पिंपरी , प्रतिनिधी शाम सोनवणे, ०४ सप्टेंबर २०२५:

भारताच्या विविधतेतील एकता आणि सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडवण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर सज्ज झाले आहे. महाराष्ट्र युवा संघटन आणि रोटरी क्लब ऑफ पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने दुसरा राष्ट्रीय सांस्कृतिक युवा आदान-प्रदान महोत्सव १५ ते १७ सप्टेंबर २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये देशातील २८ राज्यांसह ३ परदेशांतील युवा प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.


 

सद्भावना रॅली आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक

 

या तीन दिवसीय महोत्सवाची सुरुवात १५ सप्टेंबर रोजी पिंपरी चिंचवड येथील आकुर्डी परिसरात भव्य सद्भावना रॅलीने होणार आहे. यात सहभागी युवक-युवती आपापल्या राज्याच्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी होतील. या रॅलीनंतर ‘राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक’ म्हणून एक अनोखा उपक्रम राबवण्यात येणार आहे. २८ राज्यांतून आणि ३ देशांतून आणलेल्या माती आणि पाण्याचा उपयोग करून एक विशेष वृक्षारोपण केले जाईल, ज्यामुळे देशाची आणि जगाची सांस्कृतिक एकता जपण्याचा संदेश दिला जाईल.


 

सांस्कृतिक कार्यक्रम आणि ऐतिहासिक स्थळांना भेट

 

या महोत्सवादरम्यान दररोज सायंकाळी ५ ते ८ या वेळेत ग. दी. माडगुळकर सभागृहात विविध राज्यांच्या आणि देशांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे. १६ सप्टेंबर रोजी भारतातील विविध राज्यांतून आलेल्या युवक-युवतींना पिंपरी चिंचवड परिसरातील प्रेक्षणीय आणि ऐतिहासिक स्थळांचे दर्शन घडवले जाईल. १७ सप्टेंबर रोजी तासगावकर फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर निरोप समारंभाने महोत्सवाची सांगता होईल.


 

कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती

 

या महासंगमाचे उद्घाटन

या प्रसंगी प्रमुख पाहुणे उद्घाटक म्हणून पिंपरी चिंचवडचे आयुक्त माननीय शेखर सिंग,उपआयुक्त पंकज पाटील , हे उपस्थित राहणार आहेत.तसेच यावेळी नाटय परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, माजी महापौर शैलजा अविनाश मोरे, प्रदेशाध्यक्ष भाजपा युवा मोर्चाचे अनुपदादा अविनाश मोरे, युवा उद्योजक पूनीतजी बालन, जान्हवीताई बालन (धारीवाल), जिल्हा प्रांतपाल संतोष मराठे, अध्यक्ष  रो. आनंद संपत , सचिव रोहन रोकडे , समीर भंडारकर, संतोष गिरंजे, भावी प्रांतपाल पवन गुप्ता , नितीन ढमाले, रो. वंश चावला, शुभम राऊत, स्वस्ती राय, मा. सुजाता सातव मॅडम, दत्ता दळवी, मल्लिकार्जुन बंकाकुळे, विजय संतान, युवराज नाईक, महादेव कांचन, एस.एस. तिवारी, डॉ.प्रा. अन्वर शेख, डॉ. प्रा. सुधाकर जाधव, सागर घोरपडे (पोलीस), अविनाश सकुंडे (लंडन बुक ऑफ संचालक), लहु कांबळे (संस्थापक अध्यक्ष), सरपंच पल्लवी गोपाळे , संग्रामदादा कोंडे, संजय जगताप, माय भारत संचालक भारत सरकार अविनाश शेटे ,  इत्यादी मान्यवर कार्यक्रमाच्या तीनही दिवसांकरीता उपस्थित राहणार आहेत.

सदर कार्यक्रमाकरीता विशेष सहकार्य रोटरी क्लब ऑफ पिंपरी यांचे लाभले आहे. समन्वयक म्हणून विस्तार अधिकारी, जिल्हा परिषद पुणे मोतीलाल बेंद्रे  हनुमंत देसाई, संतोषी शेट्टी, दिनेश भंडारे, साहिल गायकवाड, कुणाल इटकर, प्रेम चाबुकस्वार, अभिजित रोकडे, इत्यादी युवक सदर कार्यक्रम पार पाडणार आहेत.

या महोत्सवामुळे शहराला विविध संस्कृती आणि परंपरा जवळून अनुभवण्याची संधी मिळणार आहे.


© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!