news
रहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुलपिंपरी-चिंचवडमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक करणारे आहेरकर कुटुंब नेवासामधून अटक! आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईजागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेतभारतातील म्युझिक इंडस्ट्रीला केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट; ‘PPL India’ ला मिळाली अधिकृत कॉपीराईट सोसायटी म्हणून मान्यता!मोरवाडीत पिंपरी-चिंचवड भाजपचा भव्य नियुक्ती सोहळा; भुजबळ, नेमाने, भालेराव, मोरे आणि शिर्के यांच्यावर नव्या आघाड्यांची जबाबदारी!
Home पिंपरी चिंचवड अतिक्रमणांवर थेट कारवाई: महापालिकेने वाकडचा रस्ता केला मोकळा!

अतिक्रमणांवर थेट कारवाई: महापालिकेने वाकडचा रस्ता केला मोकळा!

विकास आराखड्यातील रस्त्यासाठी मोहीम; कठोर भूमिकेमुळे शहराच्या विकासाला गती. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज.)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 

वाकड-ताथवडे येथे महापालिकेची मोठी अतिक्रमण निर्मूलन मोहीम

 


 

३८ हजार ७५० चौ. फूट क्षेत्र अतिक्रमणमुक्त; ४३ झोपड्या हटवून रस्ता मोकळा

पिंपरी, ११ सप्टेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरातील अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई करत वाकड-ताथवडे परिसरात एक मोठी अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवली. विकास आराखड्यात १८ मीटर रस्त्यासाठी आरक्षित असलेल्या जागेवरील ४३ झोपड्या निष्कासित करण्यात आल्या असून, सुमारे ३८ हजार ७५० चौरस फूट जागा अतिक्रमणमुक्त करण्यात आली आहे.


मोहिमेत विविध विभागांचा सहभाग

 

महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाचे उपायुक्त अण्णा बोदडे आणि अतिक्रमण विभागाचे सहायक आयुक्त अतुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही संयुक्त मोहीम पार पडली. यामध्ये ड क्षेत्रीय कार्यालय, स्थापत्य, झोपडपट्टी निर्मूलन, शहरी दळणवळण, नगररचना, विद्युत विभाग, अग्निशामक आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान सहभागी झाले होते.

काळाखडक, वाकड येथील स. नं. १२४/१ या मिळकतीवरील भूमकर चौकापासून ताथवडे हद्दीपर्यंतच्या १८ मीटर रस्त्याला बाधित करणाऱ्या या झोपड्या हटवण्यासाठी महापालिकेने ४ पोकलेन, ४ जेसीबी, ६ डंपर आणि २० मजूर वापरले.


वाहतूक कोंडी कमी होणार

 

या कारवाईबाबत बोलताना आयुक्त शेखर सिंह म्हणाले, “शहरातील विकास योजनांना अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर महापालिका कठोर कारवाई करत आहे. वाकड-ताथवडे परिसरातून अतिक्रमण हटवल्यामुळे या रस्त्याचे काम लवकर सुरू होईल, ज्यामुळे येथील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.”

या यशस्वी मोहिमेमुळे शहरातील विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.


© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!