news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवडला देशात प्रथम आणण्यासाठी ‘स्वच्छतेची शपथ’

पिंपरी-चिंचवडला देशात प्रथम आणण्यासाठी ‘स्वच्छतेची शपथ’

'एक तास श्रमदान' अभियानात उत्साह; देशभरातून अभ्यास दौऱ्यांसाठी अधिकारी दाखल. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 

भक्ती-शक्ती चौकात ‘स्वच्छतेचा महाउत्सव’; दोन हजारांहून अधिक नागरिकांचा ‘श्रमदानात’ सहभाग

 


 

१२ टन कचरा गोळा; त्रिपुरा राज्यातील अधिकाऱ्यांची उपस्थिती, नव्या ब्रँड ॲम्बेसिडरची घोषणा

 

पिंपरी चिंचवड, प्रतिनिधी बालाजी नवले, २५ सप्टेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या “श्रमदान एक दिवस – एक तास – एक साथ” या उपक्रमाने आज निगडीतील भक्ती-शक्ती चौकात स्वच्छतेचा महाउत्सव साजरा केला. सकाळच्या प्रसन्न वातावरणात “स्वच्छतेची शपथ” घेत, शाळकरी विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत, दोन हजारांहून अधिक नागरिकांनी या मोहिमेत उत्साहाने सहभाग घेतला. या एका तासाच्या श्रमदानात तब्बल १२ टन कचरा गोळा करण्यात आला. आमदार उमा खापरे आणि महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ झाला.


देशात प्रथम येण्याचा निर्धार

 

यावेळी बोलताना आयुक्त शेखर सिंह यांनी शहराच्या स्वच्छतेच्या यशाचे श्रेय सफाई मित्रांना दिले. “स्वच्छता सर्वेक्षण २०२४-२५ मध्ये शहराने राज्यात प्रथम तर देशात सातवा क्रमांक मिळवला आहे. आता २०२५-२६ मध्ये आपल्याला देशात प्रथम यायचे आहे,” असे सांगत त्यांनी नवीन उद्दिष्ट जाहीर केले. या अभियानात नागरिकांनी दिलेला प्रतिसाद पाहून त्यांनी विश्वास व्यक्त केला की, पिंपरी-चिंचवड हे देशात स्वच्छतेमध्ये नक्कीच अग्रेसर ठरेल.

याप्रसंगी महापालिका अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उपायुक्त सचिन पवार, क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे, अतुल पाटील, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सहाय्यक आरोग्य अधिकारी राजू साबळे, महेश आढाव, शांताराम माने, तानाजी दाते, कुंडलिक दरवडे, अंकुश झिटे,राजेश भाट, सुधीर वाघमारे, माजी नगरसदस्य सचिन चिखले, नारायण बहिरवाडे, त्रिपुरा राज्यातील आगरतळा महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अमित कर्माकर, सहाय्यक लेखाधिकारी बलई चंद्रदास, उप प्रकल्प समन्वय अधिकारी सुरोजित दास, वित्त व्यवस्थापन अधिकारी पवन पारीक, सामाजिक संरक्षक अधिकारी रेखा दुबे यांच्यासह रुपीनगर ज्येष्ठ नागरिक संघ, महेंद्र लॉजिस्टिक्स अशा विविध संस्थांचे प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, अमृता विद्यालय, मॉडर्न कॉलेज, सायरस पुनावाला स्कूल, शिशुविहार विद्यालय, प्रा.रामकृष्ण मोरे विद्यालय, पीसीईटी कॉलेज अशा विविध शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


त्रिपुरा राज्याच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती आणि नव्या ब्रँड ॲम्बेसिडरची घोषणा

 

या मोहिमेचे महत्त्व लक्षात घेऊन त्रिपुरा राज्यातील आगरतळा महापालिकेचे अधिकारी अभ्यास दौऱ्यासाठी विशेषतः उपस्थित होते. त्यांनी या अभियानाची माहिती घेतली. या कार्यक्रमात महापालिकेने २०२५ वर्षासाठी स्वच्छतेच्या नवीन ब्रँड ॲम्बेसिडरची घोषणा केली. शहरपातळीवर आर.जे. बंड्या यांच्यासह प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र ब्रँड ॲम्बेसिडरची नियुक्ती करण्यात आली. आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते या सर्वांचा सन्मान करण्यात आला.

अ प्रभाग – पवन शर्मा

ब प्रभाग – मोहन गायकवाड

क प्रभाग – अरविंद भोसले, तानाजी भोसले

ड प्रभाग – डॉ. नंदकुमार धुमाळ, बाळासाहेब साळुंखे

ई प्रभाग – विलास नाईकनवरे, सुजाता परदेशी

फ प्रभाग – सुनील कदम

ग- मनीषा राठोड,

ह प्रभाग- अदिती निकम

शहरस्तर – आर.जे. बंड्या
यांचा समावेश आहे.  तर आर.जे. बंड्या संपूर्ण शहरात स्वच्छता विषयक मोहिमेत सहभागी असणार आहेत.

 

कार्यक्रमाच्या शेवटी, उपस्थित सर्व नागरिकांनी “आम्ही स्वतः घाण करणार नाही, आणि दुसऱ्यालाही घाण करू देणार नाही” अशी स्वच्छतेची शपथ घेतली. जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी शपथेचे वाचन केले.


© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!