70
आरोग्यदायी शरीर, समर्पित मन आणि नागरिकसेवेची भावना, हीच महानगरपालिकेची खरी ताकद – अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त विविध स्पर्धांचा समारोप; अधिकारी-कर्मचारी यांच्या उत्साहाला मिळाला पुरस्कारांचा मान
पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, दि. १८ ऑक्टोबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज :
“महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी हे केवळ प्रशासनाचे घटक नाहीत, तर शहर विकासाचे प्रेरक बिंदू आहेत. आरोग्यदायी शरीर, समर्पित मन आणि नागरिकसेवेची भावना हीच महानगरपालिकेची खरी ताकद आहे,” असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी केले. खेळातून वाढणारी संघभावना, शिस्त आणि उत्साह उत्तम नागरिकसेवेसाठी आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
महापालिकेच्या ४३ व्या वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांतील विजेत्या खेळाडूंचा बक्षीस वितरण समारंभ पिंपरी येथील सावित्रीबाई फुले सभागृहात सांडभोर यांच्या हस्ते पार पडला.

महापालिकेचा वर्धापन दिन ११ ऑक्टोबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी रस्सीखेच, संगीतखुर्ची, पासिंग बॉल, धनुर्विद्या, रायफल शुटिंग, बुद्धिबळ, धावण्याच्या स्पर्धा, गोळाफेक, लांबउडी, बॅडमिंटन, टेबल टेनिस, क्रिकेट अशा अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. महिला कर्मचाऱ्यांसाठी पाककला, रांगोळी आणि फॅन्सी ड्रेस स्पर्धांनी या सोहळ्याला विशेष रंगत आणली.
विशेष म्हणजे, विधानपरिषद सदस्य अमित गोरखे आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्वतः रस्सीखेच व संगीतखुर्ची या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्साह द्विगुणित केला.
या स्पर्धांमध्ये महापालिकेच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनीही सक्रिय सहभाग घेत उल्लेखनीय यश मिळवले:
अधिकारी |
पद आणि विभाग |
स्पर्धा |
क्रमांक |
तृप्ती सांडभोर |
अतिरिक्त आयुक्त |
महिला बॅडमिंटन |
द्वितीय |
पंकज पाटील |
उप आयुक्त (क्रीडा) |
पुरुष लांब उडी |
प्रथम |
ममता शिंदे |
उप आयुक्त (समाजविकास) |
महिला गोळा फेक |
प्रथम |
हरविंदर सिंग बन्सल |
कार्यकारी अभियंता |
पुरुष बॅडमिंटन |
प्रथम |
बबन झिंजुर्डे |
कर्मचारी महासंघ अध्यक्ष |
संगीत खुर्ची |
प्रथम |
यावेळी सह आयुक्त मनोज लोणकर, उप आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता हरविंदर सिंग बन्सल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विजेत्यांची यादी
स्पर्धा |
प्रथम क्रमांक |
द्वितीय क्रमांक |
तृतीय क्रमांक |
संगीत खुर्ची (पुरुष) |
बबन झिंजुर्डे |
माधव सोनवणे |
प्रशांत जोशी |
पासिंग बॉल (महिला) |
उज्वला करपे |
संगीता वाळूंजकर |
कल्याणी ढोबळे |
रायफल शुटींग (पुरुष) |
दत्ता सूर्यवंशी |
योगेश गरड |
यश डोळस |
रायफल शुटींग (महिला) |
उमा दरवेश |
निवेदिता घार्गे |
माधुरी चव्हाण |
बुद्धिबळ (पुरुष) |
विकास शिरोळे |
अविनाश चव्हाण |
योगेश वेदरकर |
बुद्धिबळ (महिला) |
रेश्मा जगताप |
शितल पवारन |
एस. एम. राऊत |
लांब उडी (पुरुष) |
पंकज पाटील |
श्रीकांत झोरे |
दीपक कन्हेरे |
गोळा फेक (महिला) |
ममता शिंदे |
संगीता कराड |
अश्विनी घुगे |
बॅडमिंटन (पुरुष) |
हरविंदर सिंग बन्सल |
प्रशांत जगताप |
विजयसिंह भोसले |
बॅडमिंटन (महिला) |
मनीषा खेडकर |
तृप्ती सांडभोर |
सुषमा तुरुकमारे |
क्रिकेट (पुरुष) |
पुणे महानगरपालिका |
पिंपरी चिंचवड मनपा |
– |
क्रिकेट (महिला) |
पिंपरी चिंचवड मनपा |
पिंपरी चिंचवड मनपा |
– |
