news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home पिंपरी चिंचवड PCMC निवडणुकीची घंटा! – विधानसभा मतदारसंघांनुसार प्रभागनिहाय मतदार यादी तयार; सहशहर अभियंते अजय सूर्यवंशी, अनिल भालसाकळे, माणिक चव्हाण आणि सुनील भागवानी प्राधिकृत अधिकारी

PCMC निवडणुकीची घंटा! – विधानसभा मतदारसंघांनुसार प्रभागनिहाय मतदार यादी तयार; सहशहर अभियंते अजय सूर्यवंशी, अनिल भालसाकळे, माणिक चव्हाण आणि सुनील भागवानी प्राधिकृत अधिकारी

चिंचवड, पिंपरी, भोसरी आणि भोर (ताथवडे) विधानसभा मतदारसंघांतील मतदारांसाठी यादी ६ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 

महापालिका निवडणुकीची तयारी! पिंपरी-चिंचवडची प्रारूप मतदार यादी ६ नोव्हेंबरला प्रसिद्ध

 


 

हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी १४ नोव्हेंबरपर्यंत मुदत; ४ सहशहर अभियंत्यांची क्षेत्रीय कार्यालयानिहाय प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती

 

पिंपरी चिंचवड, प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २ नोव्हेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टीने प्रशासनाने मोठी पाऊले उचलली आहेत. महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील विधानसभा मतदारसंघांची प्रभागनिहाय विभाजित केलेली प्रारूप मतदार यादी येत्या ६ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. नागरिकांना या यादीवर हरकती व सूचना नोंदवण्यासाठी ६ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत संधी मिळणार आहे.

 

प्रारूप मतदार यादीवरील हरकती व सूचनांवर त्वरित छाननी, सुनावणी आणि निर्णय घेण्यासाठी महापालिकेने क्षेत्रीय कार्यालयानिहाय प्राधिकृत अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. नुकतेच बदली झालेले अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या स्वाक्षरीने याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

क्षेत्रीय कार्यालयानिहाय प्राधिकृत अधिकारी:

क्षेत्रीय कार्यालय प्राधिकृत अधिकारी
‘अ’ आणि ‘फ’ सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी
‘ब’ आणि ‘ग’ सहशहर अभियंता अनिल भालसाकळे
‘ड’ आणि ‘ह’ सहशहर अभियंता माणिक चव्हाण
‘क’ आणि ‘इ’ सहशहर अभियंता सुनील भागवानी

या प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या मदतीसाठी संबंधित क्षेत्रीय अधिकारी आणि कार्यकारी अभियंता (स्थापत्य) यांची सहायक प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 

महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील खालील विधानसभा मतदारसंघांची मतदार यादी प्रभागनिहाय विभाजित करून प्रसिद्ध केली जाणार आहे:

  • २०५- चिंचवड विधानसभा
  • २०६- पिंपरी विधानसभा
  • २०७- भोसरी विधानसभा
  • २०३- भोर विधानसभा मतदारसंघ (केवळ ताथवडे गाव समाविष्ट)

या यादीवर नागरिकांना आपल्या हरकती व सूचना महापालिकेच्या मुख्य कार्यालयातील मतदार यादी कक्षात तसेच सर्व ८ क्षेत्रीय कार्यालयांत प्रत्यक्ष दाखल करता येणार आहेत. प्राधिकृत अधिकाऱ्यांना नमुना ‘अ’ व ‘ब’ मध्ये प्राप्त होणाऱ्या सर्व हरकती व सूचनांची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!