news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home पिंपरी चिंचवड गुगलवर दिसणार लहूजी वस्ताद साळवे स्मारक! – PCMC च्या प्रारुप विकास आराखड्यातील त्रुटी सुधारल्या

गुगलवर दिसणार लहूजी वस्ताद साळवे स्मारक! – PCMC च्या प्रारुप विकास आराखड्यातील त्रुटी सुधारल्या

जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांचे मोलाचे योगदान; गणेश कलवले, चंद्रकांत दादा लोंढे, नानासाहेब कांबळे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांकडून कृतज्ञता व्यक्त. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 

आद्यक्रांतीगुरू लहूजी वस्ताद साळवे स्मारक आता ‘गुगल नकाशा’वर झळकणार! तमाम मातंग समाजाच्या मागणीला अखेर यश; शहरात आनंदोत्सव

 


 

मनपाचे जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्या प्रयत्नांमुळे स्मारकाची नोंद; मातंग समाजाकडून कृतज्ञता व्यक्त

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १२ नोव्हेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड शहरातील आद्यक्रांतीगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या चिंचवड स्टेशन येथील पुतळा स्मारकाला अखेर अधिकृत मान्यता मिळाली असून, हे स्मारक आता गुगलच्या नकाशावर (Google Maps) देखील दिसू लागले आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) प्रारूप विकास आराखड्यातून हे स्मारक वगळण्यात आल्यामुळे मातंग समाजाने तीव्र मागणी केली होती, ज्याला मोठे यश मिळाले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील मातंग समाज बांधवांनी प्रारुप विकास आराखड्यात स्मारकाचे नाव समाविष्ट करण्याची मागणी लावून धरली होती. या मागणीची दखल घेऊन मनपाचे जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक साहेब यांनी पुढाकार घेतला. त्यांनी या स्मारकाची नोंद गुगल सर्च इंजिनच्या नकाशावर घेण्यासाठी प्रामुख्याने जबाबदारी घेऊन ती पूर्ण करून घेतली.

जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांची नेहमी समाजाच्या तसेच पिंपरी चिंचवड शहरातील जनतेच्या कामासाठी आग्रही मागणी असते व ते स्वतः जातीय लक्ष घालत नाही ते काम पूर्णत्वास नेतात ही त्यांची ख्याती आहे.

या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल तमाम मातंग समाजाने प्रफुल्ल पुराणिक यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

गुगल सर्च इंजिनमध्ये स्मारकाचे नाव दिसू लागल्याने मातंग समाजातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी चिंचवड स्टेशन येथे आनंदोत्सव साजरा केला.

  • पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून, स्मारकास पुष्पहार अर्पण करून आणि हलगी (Halgi) वाजवून आपला आनंद व्यक्त केला.

यावेळी आद्यक्रांतीगुरू लहूजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वचे अध्यक्ष गणेश कलवले, राष्ट्रीय काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत दादा लोंढे, मातंग चेतना परिषदेचे ज्येष्ठ नेते नानासाहेब कांबळे, शिवशाही व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले, प्रदेशाध्यक्ष कृष्णा दादा साबळे, प्रदेश सचिव सुरज आण्णा कांबळे, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिवाजीराव खडसे, शंकर खवळे, सागर यादव, आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!