news
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवड हादरले! – नितीन गिलबिले यांच्या डोक्यात गोळी झाडून हत्या; आरोपी अमित पाथरे आणि विक्रांत ठाकूर जेरबंद

पिंपरी-चिंचवड हादरले! – नितीन गिलबिले यांच्या डोक्यात गोळी झाडून हत्या; आरोपी अमित पाथरे आणि विक्रांत ठाकूर जेरबंद

चऱ्होलीतील श्री साई रोड कॅरियरजवळ गोळीबार; वैयक्तिक वादातून थरार. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 

अलंकापुरम येथे गोळीबार! वादामधून तरुणाची हत्या चऱ्होली येथे सायंकाळी ६ च्या सुमारास घडली थरारक घटना

 


 

‘फॉर्च्युनर’ गाडीत बसलेले असतानाच वार; वढमुखवाडी येथील ३७ वर्षीय नितीन गिलबिले यांचा मृत्यू

 

पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, दि. १३ नोव्हेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड शहराला हादरवून सोडणारी एक घटना बुधवारी (दिनांक १२ नोव्हेंबर) सायंकाळी चऱ्होली परिसरात घडली आहे. अलंकापुरम ९० फूट रोडवरील श्री साई रोड कॅरियरजवळ झालेल्या अंतर्गत वादातून एका व्यक्तीच्या डोक्यात गोळी झाडून त्याची हत्या करण्यात आली. वर्दळीच्या रस्त्यावर सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास गोळीबाराचा आवाज ऐकून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

 

  • मृत व्यक्ती: नितीन गिलबिले (वय-३७ वर्षे, रा. वढमुखवाडी).
  • घटनास्थळ: श्री साई रोड कॅरियरजवळ, अलंकापुरम ९० फूट रोड, चऱ्होली.
  • वेळ: बुधवार, १२ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास.
  • आरोपी:
    1. अमित जीवन पाथरे (वय-३५, रा. चऱ्होली)
    2. विक्रांत ठाकूर (रा. सोळू, खेड)

 

मृत नितीन गिलबिले हे त्यांच्या दोन मित्रांसह बुधवारी सायंकाळी एमएच १४ एलएल ८९०० क्रमांकाच्या टोयोटा फॉर्च्युनर (Toyota Fortuner) कारमध्ये बसले होते. त्यावेळी आरोपी आणि नितीन गिलबिले यांच्यात काही वैयक्तिक कारणांवरून वाद झाला.

या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि याच दरम्यान आरोपी दोघांनी नितीन गिलबिले यांच्यावर गोळी झाडली. डोक्यात गोळी लागल्याने नितीन गिलबिले यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!