news
Home अमरावती कायदेशीर दत्तक प्रक्रिया समर्पण! – जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विलास मरसाळ यांचा अवैधरित्या दत्तक प्रक्रियेला लगाम

कायदेशीर दत्तक प्रक्रिया समर्पण! – जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विलास मरसाळ यांचा अवैधरित्या दत्तक प्रक्रियेला लगाम

अमरावती जिल्ह्यात १ ते ३० नोव्हेंबर २०२५ दरम्यान विशेष आरोग्य शिबिरे आणि कार्यशाळांचे आयोजन.(© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 

अवैध दत्तक प्रक्रियेला ‘अमरावती’त आळा घालणार! ‘आंतरराष्ट्रीय दत्तक महिना २०२५’ निमित्त जिल्हाभर विशेष उपक्रमांचे आयोजन

 


 

कारा (CARA) अंतर्गत कायदेशीर दत्तक प्रक्रियेला प्रोत्साहन; रुग्णालयांमध्ये जनजागृतीचे फलक

 

अमरावती , प्रतिनिधी अविनाश वानखेडे, दि. १४ नोव्हेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

अमरावती जिल्ह्यामध्ये महिला व बाल विकास विभागामार्फत दिनांक १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२५ हा कालावधी ‘आंतरराष्ट्रीय दत्तक महिना’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. दत्तक प्रक्रियेस प्रोत्साहन देण्यासाठी आणि कारा (CARA), नवी दिल्ली यांच्या स्तरावरून कायदेशीर दत्तक प्रक्रियेची जागरूकता आणणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या माध्यमातून अवैधरित्या होणाऱ्या दत्तक प्रक्रियेला आळा घालण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे.

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विलास मरसाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिन्यात विविध दिशादर्शक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे:

  1. दिशादर्शक कार्यप्रणाली: जिल्हास्तरावरील बालकांसंदर्भात काम करणाऱ्या यंत्रणांमार्फत ठोस दिशादर्शक कार्यप्रणाली तयार करण्यात येत आहे.
  2. आरोग्य शिबिरे: विशेष दत्तक संस्थेतील बालकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.
  3. विशेष कार्यशाळा: जिल्हयात दत्तक विषयासंबंधी काम करणाऱ्या अशासकीय आणि विशेष दत्तक संस्थांसाठी बालकांची देखरेख व काळजी घेण्याच्या अनुषंगाने विशेष कार्यशाळा आयोजित करून मार्गदर्शन केले जाईल.
  4. जनजागृती फलक: जिल्ह्यातील सर्व प्रसुतिगृहे, रुग्णालये, महानगर पालिका परिसर आणि शासकीय कार्यालय परिसरात ‘कायदेशीर व सुरक्षित दत्तक प्रक्रिया समर्पण’ याबाबत माहितीचे फलक दर्शनीय भागात लावण्याचे नियोजन आहे.

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विलास मरसाळ म्हणाले, या उपक्रमांद्वारे कायदेशीर आणि सुरक्षित दत्तक प्रक्रियेचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचवले जाईल, ज्यामुळे अवैधरित्या दत्तक प्रक्रियेला निश्चितच आळा घालता येईल.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!