news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवडमध्ये ‘ऑपरेशन हदपार’: महिलांशी गैरवर्तन आणि चोरी करणाऱ्या १६ गुन्हेगारांवर कठोर कारवाई; नावे जाहीर!

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘ऑपरेशन हदपार’: महिलांशी गैरवर्तन आणि चोरी करणाऱ्या १६ गुन्हेगारांवर कठोर कारवाई; नावे जाहीर!

'महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१' च्या कलम ५६ नुसार दोन वर्षांपर्यंत हद्दपार; गुन्हेगार आढळल्यास नागरिकांनी तातडीने ११२ वर संपर्क साधावा, पोलिसांचे आवाहन. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 

गुन्हेगारीला ‘हदपार’चा दणका! पिंपरी-चिंचवड पोलिसांनी १६ ‘सराईत गुन्हेगारांना’ ठोकल्या बेड्या; ‘सेक्शन ५६’ अन्वये मोठी कारवाई.

 


 

पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे यांच्या आदेशाने पुणे व रायगड जिल्ह्यातील गुन्हेगारांवर ‘वॉच’; हदपार केलेल्यांची नावे जाहीर. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.)

 

पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, दि. १४ नोव्हेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या (Pimpri-Chinchwad Police Commissionerate) कार्यक्षेत्रातील गुन्हेगारी वृत्तीला आळा घालण्यासाठी आणि सराईत गुन्हेगारांना प्रतिबंध घालण्यासाठी पोलिसांनी मोठी व परिणामकारक कारवाई सुरू केली आहे. आयुक्तालयाच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर कठोर आणि परिणामकारक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे आणि पोलीस सह आयुक्त श्री. सारंग आवाड यांनी सर्व पोलीस स्टेशनला दिले होते.

या आदेशानुसार, अपर पोलीस आयुक्त श्री. शशिकांत महावरकर आणि परिमंडळ-२ चे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ऑक्टोबर २०२५ या महिन्यात एकूण १६ सराईत गुन्हेगारांना ‘महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१’ (Maharashtra Police Act 1951) च्या कलम ५६ नुसार पुणे जिल्हा आणि रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यातून निर्धारित कालावधीसाठी हदपार (Externment) करण्यात आले आहे.

 

हदपार करण्यात आलेल्या या गुन्हेगारांमध्ये मारहाण, धमकी, चोरी, हातभट्टी दारू तयार करणे, अमली पदार्थ विक्री आणि महिलांना लज्जा उत्पन्न होईल अशी कृत्ये करणाऱ्यांचा समावेश आहे. हदपार करण्यात आलेल्या सर्व गुन्हेगारांची नावे आणि त्यांच्यावरील मुख्य गुन्हे खालीलप्रमाणे आहेत:

अ.क्रं. आरोपीचे नाव (वय) निवासस्थान व पोलीस स्टेशन हदपारीचा कालावधी
ऋषिकेश दादाभाऊ बोरुडे (२४) अश्विनी कॉलनी, ज्योतीबानगर, काळेवाडी ०६ महिने
ज्योती गोरख राठोड (३४) कंद्राभाट वस्ती, आंबी, ता. मावळ (तळेगाव) ०६ महिने
स्वप्नील अरुण लांडे (३५) सोमाटणे फाटा, शिंदे वस्ती, ता. मावळ (तळेगाव) ०२ वर्षाकरिता
राकेश मधुकर रेणुसे (३५) पाचणे, ता. मावळ (शिरगाव) ०१ वर्षाकरिता
करिश्मा निर्मल राठोड (३८) चांदखेड, ता. मावळ (शिरगाव) ०६ महिने
रविना विश्वास राठोड (३०) चांदखेड, ता. मावळ (शिरगाव) ०६ महिने
माला अनिल गुंजाळ (३८) वाकड रोड, कृष्णा स्वीट होम समोर, वाकड ०६ महिने
सिद्धार्थ नागनाथ थोरात (४२) निळकंठनगर, तळेगाव दाभाडे (तळेगाव दाभाडे) ०१ वर्षाकरिता
जय/किटुक प्रवीण भालेराव (१९) म्हाडा कॉलनी, सिद्धार्थ नगर, तळेगाव दाभाडे ०२ वर्षाकरिता
१० निखिल दत्तात्रय पोकळे (२३) चौराईनगद, सोमाटणे, ता. मावळ (तळेगाव दाभाडे) ०२ वर्षाकरिता
११ राजितलक धर्मा राठोड (२८) गोडरेज लेबर कॅम्प जवळ, हिंजवडी ०६ महिने
१२ लच्छाराम पुनाराम देव्हासी (३२) महेश साठे यांच्या भाड्याच्या खोलीत, फेज ३ मान, ता. मुळशी ०६ महिने
१३ अंचिता अनिरुद्ध रॉय (३६) रचना कन्स्ट्रक्शन साईडच्या मागे, लेबर कॅम्पमध्ये, सुसगाव, ता. मुळशी ०६ महिने
१४ संदीप रमेश सुर्यवंशी (४६) मनोज गोपाळे यांच्या भाड्याच्या खोलीत, शिरगाव ०१ वर्षाकरिता
१५ विशाल/साकी संजय गायकवाड (३८) सव्र्हेट कॉलनी, दत्तमंदिर रोड, वाकड ०२ वर्षाकरिता
१६ निलेश शंकर वाघमारे (३६) भाऊसाहेब निवास, वाकड गावठाण, वाकड ०२ वर्षाकरिता

परिणामकारक प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी पोलीस परिमंडळ-२ कार्यक्षेत्रातील १०० हून अधिक गुन्हेगारांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

उपायुक्त विशाल गायकवाड यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, वर नमूद केलेले हदपार केलेले सराईत गुन्हेगार त्यांच्या हदपारीच्या कालावधीत पुणे जिल्ह्यात दिसल्यास, तातडीने नियंत्रण कक्ष क्र. ११२ तसेच नजीकच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधून माहिती कळवावी.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!