news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये आता ‘घर घर संविधान’! विद्यार्थ्यांना मिळणार समानता, न्याय आणि बंधुतेचे धडे

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये आता ‘घर घर संविधान’! विद्यार्थ्यांना मिळणार समानता, न्याय आणि बंधुतेचे धडे

अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापकांना मार्गदर्शन; उपायुक्त अण्णा बोदडे आणि सहायक आयुक्त किरणकुमार मोरे यांनी केले लोकशाही संस्कारांचे महत्त्व स्पष्ट. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

‘संविधान हा राष्ट्रग्रंथ’! विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक मूल्यांची रुजवणूक करा – नूरखाँ पठाण

 

संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर PCMC च्या मुख्याध्यापकांसाठी विशेष व्याख्यान; ‘घर घर संविधान’ उपक्रम राबविणार

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १९ नोव्हेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड महापालिका (PCMC) आपल्या शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संविधानाबद्दल आदर आणि जागरूकता वाढवण्यासाठी सक्रिय झाली आहे. संविधान दिनाच्या (२६ नोव्हेंबर) पार्श्वभूमीवर, महापालिका शाळांतील सर्व मुख्याध्यापकांसाठी चिंचवड स्टेशन येथील ॲटो क्लस्टर येथे एका विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात संविधान अभ्यासक नुरखॉं पठाण यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले.

नुरखॉं पठाण यांनी यावेळी अत्यंत महत्त्वाचे प्रतिपादन केले. ते म्हणाले की, “विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल आदर आणि जागरूकता वाढविण्यासाठी प्रत्येक शिक्षकाने बांधील राहिले पाहिजे. संविधान हा राष्ट्रग्रंथ असून हा भाव प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात दृढ करावा.”

हा कार्यक्रम आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.

 

कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या (Preamble) सामूहिक वाचनाने झाली. या सामूहिक वाचनातून संविधानातील मूल्ये, तत्त्वे आणि नागरिकांच्या कर्तव्यांची जाणीव पुन्हा अधोरेखित करण्यात आली.

संविधान अभ्यासक नुरखॉं पठाण यांनी उपस्थितांना संविधान म्हणजे काय, नागरिकांचा संविधानाशी असलेला संबंध, दैनंदिन जीवनातील संविधानाचे स्थान आणि महत्त्व, संविधानाचा उपयोग, तसेच स्वातंत्र्य संग्रामातील राजकीय, सामाजिक आणि सामाजिक लढा यावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी संविधान निर्मितीची ऐतिहासिक पार्श्वभूमी, मसुदा समितीचे योगदान आणि भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये यांचेही सखोल विश्लेषण केले.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक मूल्यांची रुजवणूक करण्याचे महत्त्व विशद केले.

अण्णा बोदडे, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका यांनी स्पष्ट केले, “भारतीय संविधान या देशातील चरा चराचे संरक्षण व संवर्धन करणारे आहे. संविधानातील मूल्ये ही केवळ अभ्यासाचा भाग नसून विद्यार्थ्यांच्या दैनंदिन वर्तनात दिसली पाहिजेत. शिक्षकांनी या मूल्यांची बीजे विद्यार्थ्यांच्या मनात रोवली, तर समाजातील लोकशाही संस्कार अधिक दृढ होतील.”

किरणकुमार मोरे, सहायक आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका यांनी महत्त्वाचा उपक्रम जाहीर केला. ते म्हणाले, “संविधान हे आपल्या लोकशाही व्यवस्थेचे प्राण आहे. महापालिका शाळांमधील प्रत्येक विद्यार्थी संविधानातील मूल्यांना जाणून वाढला, तर समाज अधिक मजबूत बनेल. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये समानता, न्याय, बंधुता आणि स्वातंत्र्य यांसारख्या मूलभूत मूल्यांचे संजीवनीरूप संस्कार करावेत, हीच संविधान दिनाची खरी प्रेरणा आहे, तसेच ‘घर घर संविधान’ हा उपक्रम सर्व शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे.”

या महत्त्वपूर्ण कार्यक्रमास महापालिका उपायुक्त अण्णा बोदडे, प्रशासन अधिकारी संगीता बांगर, सहायक प्रशासन अधिकारी रजिया खान, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह शिक्षण विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि महापालिकेच्या विविध शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले, तर प्रास्ताविक संगीता बांगर यांनी केले.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!