news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home पिंपरी चिंचवड मसाज पार्लर-लॉजमध्ये वेश्याव्यवसाय करणाऱ्यांवर ‘पिटा’ कायद्याचा बडगा! ‘रुपेन स्पा’, ‘द वेदा स्पा’ सह ४ आस्थापनांना १ वर्षासाठी ‘सीलबंद’

मसाज पार्लर-लॉजमध्ये वेश्याव्यवसाय करणाऱ्यांवर ‘पिटा’ कायद्याचा बडगा! ‘रुपेन स्पा’, ‘द वेदा स्पा’ सह ४ आस्थापनांना १ वर्षासाठी ‘सीलबंद’

पोलीस उप आयुक्त डॉ. शिवाजी पवार आणि सहा. पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण, वाकड, हिंजवडी आणि सांगवी परिसरात छापे; लॉज चालक गजानन सटवाजी आव्हाड याला अटक. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाची अवैध धंद्यांवर मोठी कारवाई! वेश्याव्यवसायासाठी वापरले जाणारे ४ मसाज पार्लर/फ्लॅट बंद करण्याचे आदेश

 

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानंतर ‘AHTC’ कडून धडक मोहीम; २०२५ मध्ये ४२ आरोपींना अटक, ५५ महिलांची सुटका

 

पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, दि. २३ नोव्हेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे यांनी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला (AHTC) अनैतिक मानवी वाहतूक आणि अवैध वेश्याव्यवसायाविरुद्ध कठोर व कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार आणि सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे-१) डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली AHTC चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांच्या पथकाने अनेक ठिकाणी धडक कारवाई केली आहे.

काल, शुक्रवार, दिनांक २१ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास चाकण पोलीस स्टेशन हद्दीतील आळंदी फाट्याजवळील सप्तगिरी लॉज येथे छापा टाकण्यात आला.

  • कारवाई: वेश्यागमनासाठी वापरण्यात येणाऱ्या ५ पीडित महिलांची सुटका करण्यात आली.

  • गुन्हा दाखल: लॉज चालक/मालक गजानन सटवाजी आव्हाड (वय-२८, रा. आळंदी, ता. खेड, जि. पुणे मूळ रा. दहिटणा, ता. जि. परभणी) याच्याविरुद्ध चाकण पोलीस स्टेशन येथे भा.न्या.सं. कलम १४३ (३) सह पिटा कलम ३, ४, ५ प्रमाणे गुन्हा (गु.र.नं. १०३३/२०२५) नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे.

मागील आठवड्यातही हिंजवडी परिसरातील “सनराईज वेलनेस आयुर्वेदिक स्पा” आणि रावेत परिसरातील “निसर्गरम आयुर्वेदिक स्पा” येथे छापा टाकून वेश्यागमनासाठी वापरल्या जाणाऱ्या ३ महिलांची सुटका करून स्पा चालक/मालक महिलेवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे यांनी सार्वजनिक ठिकाणांच्या परिसरात वेश्याव्यवसाय करणाऱ्या एकूण ४ आस्थापना १ वर्षाच्या कालावधीसाठी बंद करण्याचे आदेश प्राथमिक चौकशी अंती पारित केले आहेत.

यामध्ये वाकड परिसरातील “रुपेन स्पा” व रहिवासी फ्लॅट, हिंजवडी परिसरातील “द वेदा स्पा” आणि सांगवी परिसरातील “न्य ओम स्पा” यांचा समावेश आहे. सार्वजनिक ठिकाणी वेश्याव्यवसाय करणाऱ्या इतर आस्थापनांचीही प्राथमिक चौकशी चालू असून, लवकरच योग्य ते आदेश निर्गमित करण्यात येणार आहेत.

पोलीस आयुक्तालयाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने २०२५ या वर्षात अवैध वेश्याव्यवसायावर केलेल्या कारवाईचा तपशील उल्लेखनीय आहे:

बाबी संख्या
एकूण छापे/गुन्हे २६ आस्थापनांवर (भा.न्या.सं. सह पिटा कायद्यांतर्गत)
मसाज पार्लर/स्पा
हॉटेल/लॉज
रहिवासी फ्लॅट
ऑनलाईन वेश्याव्यवसाय १०
एकूण आरोपी अटक ४२
पीडित महिलांची सुटका ५५
सार्वजनिक ठिकाणी गुन्हे (PITA Act, कलम ८) ६५ गुन्हे (९७ महिलांवर नोंद)

पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची ही धडक कारवाई भविष्यात देखील अधिक तीव्र करण्यात येणार आहे.

या उल्लेखनीय कामगिरीत पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे, मा. पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. सारंग आवाड, मा. पोलीस उप आयुक्त डॉ. शिवाजी पवार (गुन्हे), मा. सहा. पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे (गुन्हे-१) यांच्या मार्गदर्शनाखाली AHTC चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नितीन गीते, सपोनि श्री. भास्कर पुल्ली, अंमलदार सपोफो सुनील शिरसाठ, पोहवा/४९१ भगवंत मुठे, पोहवा/१५३६ मारुती करचंडे, पोहवा/१७६८ गणेश करोठे, मपोहवा/१००६ श्रद्धा भरगुडे, मपोहवा/१३७७ वैष्णवी गावडे, मपोहवा/११२९ निलम बुचडे, मपोहवा/१३७८ संगीत जाधव, पेशी/१७९० उदयकुमार भेसले यांचा सक्रिय सहभाग होता.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!