news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home पिंपरी चिंचवड पिंपरी वाघेरेत विचारांची आणि पर्यावरणाची पेरणी! बी. आर. आंबेडकर विचार मंचाकडून महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष कार्यक्रम

पिंपरी वाघेरेत विचारांची आणि पर्यावरणाची पेरणी! बी. आर. आंबेडकर विचार मंचाकडून महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष कार्यक्रम

सुमीत थोरात, खलकर साहेब, मयुस्टोम, चंद्रमणी जोगदंड, मिलींद लव्हाळे, अमित खोब्रागडे, प्रकाश बुधार आणि शाम सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त म्हाडा टॉवर्स, पिंपरी वाघेरे येथे वृक्षारोपण आणि व्याख्यानाचे आयोजन

 

 

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणे हीच खरी आदरांजली’: युवानेते राहुल सोनवणे यांचे प्रतिपादन

 

पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, दि. ६ डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज: 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पिंपरी-चिंचवडमधील म्हाडा टॉवर्स, पिंपरी वाघेरे येथे वृक्षारोपण आणि व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘बी. आर. आंबेडकर विचार मंच म्हाडा पिंपरी वाघेरे’ यांच्या वतीने या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सुमीत थोरात यांनी भूषवले.

यावेळी युवानेते राहुल सोनवणे यांनी प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणे हिच खरी आदरांजली” या विषयावर आपले मत मांडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व आणि ते आचरणात आणण्याची गरज त्यांनी स्पष्ट केली.

व्याख्यानाच्या जोडीलाच सामुदायिक बांधणीच्या भावनेतून वृक्षारोपण देखील करण्यात आले. या कार्यक्रमाला खलकर साहेब आणि मयुस्टोम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मयुर राजेंद्र टोके यांनी केले, तर मंगेश मेश्राम यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंद्रमणी जोगदंड, मिलींद लव्हाळे आणि अमित खोब्रागडे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी प्रकाश बुधार आणि शाम सोनवणे यांची देखील उपस्थिती होती.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!