news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home पिंपरी चिंचवड इमारतींच्या सामाईक जागा आणि जिन्यांमध्ये ज्वलनशील वस्तू ठेवू नका! पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागाचा नागरिकांना गंभीर इशारा

इमारतींच्या सामाईक जागा आणि जिन्यांमध्ये ज्वलनशील वस्तू ठेवू नका! पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागाचा नागरिकांना गंभीर इशारा

जबाबदार नागरिकच सुरक्षित शहराचा भक्कम आधारस्तंभ - अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे; उपायुक्त व्यंकटेश दुर्वास आणि अग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे यांचे आवाहन. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

अग्निसुरक्षा भक्कम करण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करा! अडथळे निर्माण करणाऱ्या वस्तू तात्काळ हटवण्याचे महापालिकेचे आवाहन

 

 

जिन्याचे मार्ग आणि सामाईक जागा मोकळ्या ठेवा; आपत्कालीन बचाव कार्यात अडथळे टाळा – अग्निशमन विभाग

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि.१० डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड शहरात वाढत्या अग्निदुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाने शहरवासीय, गृहनिर्माण सोसायट्या आणि व्यावसायिक आस्थापनांना अग्निसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे गंभीर आवाहन केले आहे.

इमारतींमध्ये जिने, कॉरिडॉर, टेरेस आणि सामाईक जागांमध्ये साठवले जाणारे अडगळीचे व ज्वलनशील साहित्य आग लागण्याचा धोका वाढवते. अग्निशमन विभागाने म्हटले आहे की, अशा ठिकाणी असणाऱ्या निरुपयोगी, ज्वलनशील किंवा अडथळा निर्माण करणाऱ्या साहित्याची तातडीने आणि योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी किंवा ते इमारतीबाहेर सुरक्षित स्थळी ठेवावे.

धोक्याची कारणे:

  • ज्वलनशील साहित्याच्या साठवणीमुळे आग वेगाने पसरू शकते.

  • अडथळा निर्माण झाल्यामुळे आपत्कालीन निकास मार्ग (Exit Route) उपलब्ध राहत नाही.

  • आगीमुळे धूर आणि उष्णता पॅसेजमध्ये पसरल्याने आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांची सुटका करणे आणि बचावकार्य करणे कठीण होते.


  • ज्वलनशील, अडथळा निर्माण करणारे किंवा अडगळीचे साहित्य तात्काळ हटवावे.

  • अशा साहित्याची विल्हेवाट लावणे शक्य नसल्यास ते इमारतीबाहेर सुरक्षित स्थळी ठेवावे.

  • फायर एक्सिट, जिना, कॉरिडॉर, टेरेस, इलेक्ट्रिक पॅनल रूम येथे कोणत्याही प्रकारचा अडथळा ठेवू नये.

  • आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना सुरक्षितपणे त्वरित बाहेर जाण्यास अडथळा निर्माण होऊ नये, याची विशेष खबरदारी घ्यावी.

  • नागरिकांनी आपल्या इमारतीत स्वच्छता, मोकळी जागा, अडथळामुक्त मार्ग आणि योग्य अग्निसुरक्षा याकडे अधिक गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.


विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका:

“पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अग्निशमन विभाग शहराच्या सुरक्षिततेसाठी नेहमीच तत्पर आहे. प्रशासनाचे प्रयत्न तेव्हाच यशस्वी ठरतात, जेव्हा नागरिक जागरूकपणे सुरक्षेच्या दृष्टिने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करतात. सुरक्षित शहर निर्माण करण्यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. जबाबदार आणि जागरूक नागरिक हे सुरक्षित शहराचे सर्वात मोठे भक्कम आधारस्तंभ आहेत.”

व्यंकटेश दुर्वास, उपायुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका:

“अग्निशमन विभागाचे जवान जीव धोक्यात घालून प्रत्येक आपत्कालीन परिस्थितीत मदतकार्य करण्यास तत्पर राहतात. त्यांची कामे अधिक प्रभावीपणे व शीघ्रतेने पार पाडण्यासाठी शहरातील नागरिकांनी सुरक्षित, मोकळी आणि अडथळामुक्त जागा निर्माण करणे आवश्यक आहे. वेळेवर अग्निसुरक्षा व बचावकार्य उपलब्ध झाले तर मोठ्या प्रमाणावर जीवित आणि मालमत्तेची हानी टाळली जाऊ शकते.”

ऋषिकांत चिपाडे, अग्निशमन अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका:

“अडगळीचे आणि निरुपयोगी साहित्य कोणत्याही इमारतीसाठी धोक्याचे कारण ठरू शकते. अशा वस्तूंमुळे बचावमार्ग अडवला जातो आणि आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी लागणारा मौल्यवान वेळ कमी शिल्लक राहतो. सर्व इमारतींमधील सामाईक जागा स्वच्छ, मोकळ्या आणि अडथळामुक्त ठेवणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. आपत्कालीन निकास मार्ग अडथळा विरहित असल्यास अग्निशमन जवानांना दुर्घटनास्थळी त्वरेने पोहोचता येते.”


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!