news
काळेवाडीतील ‘रागा पॅलेस’ येथे रंगला दिमाखदार स्नेहमेळावा; ‘सरगम ग्रुप’च्या संगीतमय कार्यक्रमाने उपस्थितांची जिंकली मनेपिंपळे निलख येथील ‘गुरुकृपा सोसायटी’तील अनधिकृत बांधकामावर कारवाईत दिरंगाई; मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशालाही महापालिका प्रशासनाकडून केराची टोपली?पुण्याहून मुंबईकडे जाताना फॉर्च्युनर कारची टेम्पोला भीषण धडक; कारमधील एक जण गंभीर जखमी, तर तिघे सुदैवाने बचावलेसुगम बदली आणि शासकीय लाभ मिळवण्यासाठी बोगस दाखल्यांचा वापर; त्रिसदस्यीय चौकशी समितीच्या अहवालानंतर मोठी कारवाईशिक्षण सुधारणा आणि बेरोजगारीला राष्ट्रीय मुद्दा बनवण्याचा संकल्प; मुख्य प्रवक्ते सौरव दास, प्रवक्ते आशुतोष रांका यांच्यासह कोअर टीमच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवडमध्ये सराईत गुन्हेगारांची नाकेबंदी! निगडी, पिंपरी आणि रावेत परिसरातील ८ गुन्हेगार हद्दपार

पिंपरी-चिंचवडमध्ये सराईत गुन्हेगारांची नाकेबंदी! निगडी, पिंपरी आणि रावेत परिसरातील ८ गुन्हेगार हद्दपार

पोलीस उप-आयुक्त संदीप आटोळे यांची मोठी कारवाई; २० ते २७ वयोगटातील गुन्हेगारांवर पोलिसांची करडी नजर, पहा तडीपार झालेल्यांची संपूर्ण यादी. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड पोलिसांचा गुन्हेगारांवर दरारा! नोव्हेंबरमध्ये ८ सराईत गुन्हेगार तडीपार; वर्षभरात एकूण ६३ जणांना ठोकला इंगा

 

 

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांचे गुन्हेगारी वृत्तीला आळा घालण्यासाठी कठोर आदेश; तडीपार गुन्हेगार जिल्ह्यात आढळल्यास त्वरित माहिती देण्याचे आवाहन

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि.२० डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड (दि. १८ डिसेंबर २०२५): पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय क्षेत्रात गुन्हेगारी वृत्तीला आळा घालण्यासाठी आणि शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर ठोस आणि परिणामकारक प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या हेतूने नोव्हेंबर २०२५ या महिन्यात एकूण ०८ सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ-१) संदीप आटोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५५, ५६ व ५७ नुसार खालील गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे:

अ.क्र. आरोपीचे नाव व वय राहण्याचे ठिकाण तडीपार कालावधी
गंगाधर देवेंद्र नाटेकर (२४) रमाबाईनगर, रावेत ६ महिने
अयुब चमन खान (२७) संग्रामनगर झोपडपट्टी, निगडी २ वर्षे
आकाश अतुल कदम (२०) ओटास्कीम, निगडी १ वर्ष
विशाल ऊर्फ डंगळ्या रामधनिया खरात (२२) समर्थ हौ. सोसा., निगडी २ वर्षे
शुभम ऊर्फ सोन्या सुनील गायकवाड (२३) महिंद्रा अँथिया मागे, पिंपरी १ वर्ष
अनिकेत दत्ता वाघमारे (२५) यशवंतनगर, नेहरूनगर, पिंपरी १ वर्ष
अजय सुखदेव माने नितीन टिंगरे चाळ, धानोरी ६ महिने
शुभम बबन नवले (२२) पिंपळे गुरव १ वर्ष

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह-पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर आणि अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत एकूण ६३ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. याशिवाय, शहरातील १०० हून अधिक संशयित आणि सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर पोलीस प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून आहे.

हद्दपार करण्यात आलेले हे सर्व गुन्हेगार २० ते २७ वयोगटातील असून त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. जर हे गुन्हेगार त्यांच्या तडीपारीच्या कालावधीत पुणे जिल्हा किंवा आयुक्तालय क्षेत्रात दिसून आले, तर नागरिकांनी त्वरित नियंत्रण कक्ष क्र. ११२ किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उप-आयुक्त संदीप आटोळे यांनी केले आहे.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!