news
काळेवाडीतील ‘रागा पॅलेस’ येथे रंगला दिमाखदार स्नेहमेळावा; ‘सरगम ग्रुप’च्या संगीतमय कार्यक्रमाने उपस्थितांची जिंकली मनेपिंपळे निलख येथील ‘गुरुकृपा सोसायटी’तील अनधिकृत बांधकामावर कारवाईत दिरंगाई; मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशालाही महापालिका प्रशासनाकडून केराची टोपली?पुण्याहून मुंबईकडे जाताना फॉर्च्युनर कारची टेम्पोला भीषण धडक; कारमधील एक जण गंभीर जखमी, तर तिघे सुदैवाने बचावलेसुगम बदली आणि शासकीय लाभ मिळवण्यासाठी बोगस दाखल्यांचा वापर; त्रिसदस्यीय चौकशी समितीच्या अहवालानंतर मोठी कारवाईशिक्षण सुधारणा आणि बेरोजगारीला राष्ट्रीय मुद्दा बनवण्याचा संकल्प; मुख्य प्रवक्ते सौरव दास, प्रवक्ते आशुतोष रांका यांच्यासह कोअर टीमच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
Home पिंपरी चिंचवड गुन्हेगारीचा बिमोड! वाकड, तळेगाव आणि देहूरोड परिसरातील ८ गुन्हेगार हद्दपार; पोलिसांची मोठी कारवाई

गुन्हेगारीचा बिमोड! वाकड, तळेगाव आणि देहूरोड परिसरातील ८ गुन्हेगार हद्दपार; पोलिसांची मोठी कारवाई

खंडणी, हातभट्टी आणि दहशतीचे गुन्हे करणाऱ्यांवर पोलीस उप-आयुक्त विशाल गायकवाड यांचा दणका; तडीपार गुन्हेगारांची संपूर्ण यादी प्रसिद्ध. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड पोलिसांचा गुन्हेगारांविरुद्ध ‘ॲक्शन मोड’! नोव्हेंबरमध्ये परिमंडळ-२ मधील ८ सराईत गुन्हेगार तडीपार

 

 

पुणे जिल्हा आणि रायगडच्या खालापूर तालुक्यातून बंदी; टोळीप्रमुखांसह सराईतांना पोलिसांचा दणका

पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे,दि.२० डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज: 

पिंपरी (दि. २० डिसेंबर २०२५): पिंपरी-चिंचवड शहरात सराईत गुन्हेगारांची दहशत मोडीत काढण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह-पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर आणि अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली नोव्हेंबर २०२५ या महिन्यात परिमंडळ-२ मधील ०८ सराईत गुन्हेगारांना पुणे जिल्हा आणि रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातून तडीपार करण्यात आले आहे.


पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ-२) विशाल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५५, ५६ व ५७ नुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

अ.क्र. पोलीस ठाणे आरोपीचे नाव आणि वय गुन्ह्याचे स्वरूप तडीपार कालावधी
तळेगाव दाभाडे प्रशांत अरुण दुबे (३०) बेकायदेशीर गावठी दारू विक्री (८ गुन्हे) ०१ वर्ष
वाकड रोहन ऊर्फ गंग्या वासुदेव वाघमारे (३०) शस्त्राने धाक दाखवणे, जबरी चोरी (१२ गुन्हे) ०२ वर्षे
तळेगाव दाभाडे मयूर सुहास मुऱ्हे (२९) खंडणी, कोयत्याने दहशत निर्माण करणे (६ गुन्हे) ०२ वर्षे
शिरगाव

१. यशोदादास विजय राठोड (२७) (टोळी प्रमुख)


२. आकाश रवी मैनावात (२९)

घरफोडी आणि परिसरात दहशत निर्माण करणे ०२ वर्षे
वाकड

१. ऋतिक बन्सी ढसाळ (२५) (टोळी प्रमुख)


२. गौरव ऊर्फ बॉक्सर ढसाळ (२२)


३. रोहित महादेव सोनवणे (२२)

मारहाण करून दहशत पसरवणे (३ गुन्हे) ०२ वर्षे
वाकड अर्जुन पूनम कुंभार बेकायदेशीर हातभट्टी दारू विक्री (५ गुन्हे) ०६ महिने
वाकड धिरज दादा वाघमारे (२९) वाहनांची तोडफोड, वाहन चोरी आणि दहशत ०२ वर्षे
देहूरोड अमन अमिन शेख (२४) अपहरण आणि जबरदस्तीने पैसे उकळणे (३ गुन्हे) ०२ वर्षे

परिमंडळ-२ च्या कार्यक्षेत्रातील १०० हून अधिक गुन्हेगारांच्या हालचालींवर पोलीस बारकाईने लक्ष ठेवून आहेत. गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी भविष्यातही अशाच प्रकारची ठोस आणि परिणामकारक प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

हद्दपार केलेले वरील गुन्हेगार जर त्यांच्या तडीपारीच्या कालावधीत पुणे जिल्हा किंवा खालापूर तालुक्यात कोठेही दिसून आल्यास, नागरिकांनी तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष (११२) किंवा संबंधित पोलीस ठाण्याला माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस उप-आयुक्त विशाल गायकवाड यांनी केले आहे.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!