news
“बाळापूर तालुक्यातील जुगार अड्ड्याचा पर्दाफाश!” गुन्हे शाखेने (LCB) रंगेहात पकडले १७ आरोपी; शेगाव, अकोला आणि वाशिममधील जुगारांचे जाळे उघड“दोन समाजांमध्ये भडका उडवणाऱ्या पोस्टवर पोलिसांची स्वतःहून फिर्याद!” डाबकी रोड पोलीस स्टेशन हद्दीतील कारवाई; यश शर्मा आणि निरंज ठाकूर अटकेत, तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू“अस्वच्छता आणि प्लास्टिक वापरणाऱ्यांचे धाबे दणाणले!” ३१ हजार रुपयांचा दंड वसूल; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशाने प्रभाग ८ आणि ९ मध्ये प्रशासनाचा ‘ॲक्शन मोड’“भविष्यात रस्ता पुन्हा उकरावा लागू नये यासाठी आताच समन्वय ठेवा!” महापौर रवि लांडगे यांचा पाहणी दौरा; प्रभाग ५ मधील विकासकामांचा घेतला आढावा, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाला सूचना“शिक्रापूर ते जातेगावपर्यंतच्या सीसीटीव्ही फुटेजने लावला छडा!” ६ महिला आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; रिक्षा आणि ट्रकचा वापर करून पसार होणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
Home पिंपरी चिंचवड निष्ठेचा अंत की बंडाचे निशाण? सचिन साठेंचे तिकीट कापल्याने भाजपमध्ये ‘भूकंप’; हजारो कार्यकर्त्यांचा निवडणूक लढवण्याचा आग्रह

निष्ठेचा अंत की बंडाचे निशाण? सचिन साठेंचे तिकीट कापल्याने भाजपमध्ये ‘भूकंप’; हजारो कार्यकर्त्यांचा निवडणूक लढवण्याचा आग्रह

जगताप, नांदगुडे, इंगवले समर्थकांचा साठेंना जाहीर पाठिंबा; 'शब्दाला न जागणाऱ्या' नेतृत्वाविरोधात प्रभाग २६ मध्ये संतापाची लाट. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला बंडाळीचे ग्रहण? सचिन साठेंची उमेदवारी कापल्याने कार्यकर्त्यांमध्ये संताप

 

 

प्रभाग २६ मध्ये राजकारण तापले; दोन दिवसांत मोठा निर्णय घेण्याचे सचिन साठे यांचे संकेत

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १ जानेवारी २०२६, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड (दि. १ जानेवारी २०२६): उमेदवारीचा पक्का शब्द देऊनही ऐनवेळी पत्ता कापल्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील प्रभाग क्रमांक २६ मध्ये भाजपविरुद्ध नाराजीचा उद्रेक झाला आहे. निष्ठावंत नेते आणि माजी शहराध्यक्ष सचिन मुरलीधर साठे यांचे तिकीट डावलल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते आणि समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, साठे आता बंडाच्या तयारीत असल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे.


सचिन साठे हे सन २००० पासून चिंचवडच्या राजकारणात सक्रिय आहेत. त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील काही महत्त्वाचे टप्पे आजच्या बैठकीत चर्चेत राहिले:

  • निष्ठेची किंमत: काँग्रेसचे शहराध्यक्ष असताना दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी त्यांना पक्षप्रवेशाची ऑफर दिली होती. मात्र, पक्षाच्या कठीण काळात काँग्रेस न सोडता त्यांनी आपली निष्ठा जपली होती.

  • भाजप प्रवेश: नंतरच्या काळात आमदारांच्या आग्रहाखातर आणि उमेदवारीच्या शब्दावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, आज तो शब्द पाळला न गेल्याने साठे समर्थकांनी संताप व्यक्त केला आहे.

आपल्या कार्यालयात हजारो कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सचिन साठे भावूक झाले. ते म्हणाले:

“मला उमेदवारीचा शब्द दिला असताना कोणत्या निकषांवर माझे नाव डावलले, याचे कारण मी नक्कीच विचारणार आहे. माझा परिवार फक्त साठे परिवार नसून जगताप, नांदगुडे, इंगवले, कांबळे अशा हजारो कार्यकर्त्यांचा आहे. सर्वांशी चर्चा करून येत्या दोन दिवसांत मी माझी पुढील भूमिका जाहीर करेन.”

या बैठकीला प्रभाग २६ मधील दिग्गज नेते आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. “कोणत्याही परिस्थितीत माघार घेऊ नका, संपूर्ण जनता तुमच्या पाठीशी आहे,” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. साठे यांच्या प्रत्येक निवडणुकीत मतांचा टक्का वाढत गेल्याचा दावा यावेळी समर्थकांनी केला.

 

काळुशेठ नांदगुडे, भुलेश्वर नांदगुडे, श्रीकांत पाटील, राजाभाऊ मासूळकर, विजय जगताप, रवी शेठ काटे, भरत इंगवले, अरुणा ताई सूर्यवंशी, अनिल संचेती, माऊली बालवडकर, संजय दळवी, सुरेश साठे, अरुण नांदगुडे, रवी शेठ साठे, साहेबराव नांदगुडे, विजय पाटुकले, शेखर जगताप, रमेश नांदगुडे, नागेश जाधव, माऊली मुरकुटे बैठकीस  प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

सचिन साठे यांच्या पुढील निर्णयामुळे प्रभाग २६ मधील भाजपच्या अधिकृत उमेदवाराच्या अडचणी वाढणार असून, येथे तिरंगी किंवा अपक्ष विरुद्ध भाजप अशी लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!