news
“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ“७ मार्चच्या जबरी चोरीचा छडा, सोन्याचे मिनी गंठण जप्त!” हिंजवडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; फरार साथीदार विशाल काळेचा शोध सुरू, परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या टोळीला चाप
Home पिंपरी चिंचवड ‘नवे गडी’ सुखावले, पण ‘जुने’ दुखावले? भाजपमधील अंतर्गत संघर्षाने कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस; स्वीकृत पदाचा पेच वाढला

‘नवे गडी’ सुखावले, पण ‘जुने’ दुखावले? भाजपमधील अंतर्गत संघर्षाने कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस; स्वीकृत पदाचा पेच वाढला

सत्तर-ऐंशी जागा जिंकूनही निष्ठावान सतरंजीच उचलणार का? आमदार शंकर जगताप आणि महेश लांडगे यांच्या भूमिकेकडे कार्यकर्त्यांच्या नजरा. (© २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

भाजपच्या विजयानंतर ‘निष्ठावंतांचा’ श्वास कोंडला; स्वीकृत नगरसेवकपदासाठी ‘आयाराम’ की ‘सतरंजी’ उचलणारे?


पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी बालाजी नवले, १९ जानेवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या एकहाती सत्तेनंतर आता खऱ्या संघर्षाला सुरुवात झाली आहे. पक्षासाठी अनेक वर्षे आंदोलने, मोर्चे आणि पोलीस केसेस अंगावर घेणाऱ्या जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांना न्याय मिळणार की, सत्तेच्या वारीत सहभागी झालेल्या ‘आयाराम-गयारामां’ची चांदी होणार, यावरून शहरात मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. विशेषतः स्वीकृत नगरसेवकपदाच्या पाच जागांसाठी आता इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे.

निवडणुकीच्या काळात अनेक प्रभागांमध्ये राष्ट्रवादीतून आलेल्यांना उमेदवारी देण्यात आली, ज्यामुळे मूळ भाजप कार्यकर्त्यांना आपली इच्छा बाजूला ठेवावी लागली. आता सत्ता आल्यावर तरी प्रशासकीय कामात आणि शहराच्या नियोजनात जुन्या अनुभवी चेहऱ्यांना स्थान मिळेल का, हा मोठा प्रश्न आहे. “फक्त सतरंजी उचलण्यासाठीच जुन्या कार्यकर्त्यांचा वापर होणार का?” असा संतप्त सवाल आता तळागाळातील कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे.

भोसरी विधानसभेतील राजकारण आता ‘स्वीकृत’ पदाच्या निमित्ताने पुन्हा एकदा तापले आहे. आमदार महेश लांडगे यांचे कट्टर विरोधक मानले जाणारे सचिन काळभोर यांचा मुद्दा सध्या शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. काळभोर यांना कार्यकारिणीतून बाजूला ठेवल्यानंतर, प्रभाग क्रमांक १३ मध्ये उमेदवारी मिळण्यापासूनही त्यांना रोखण्यात आल्याची चर्चा आहे. तरीही काळभोर यांनी पक्षनिष्ठा जपत भाजपच्या उमेदवाराचा प्रचार केला. आता आमदार महेश लांडगे काळभोर यांना स्वीकृत पदाच्या शर्यतीत पुन्हा डावलणार की त्यांना न्याय मिळणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

स्वीकृत नगरसेवकपदासाठी भाजपमधील अनेक ज्येष्ठ आणि निष्ठावान नावांची चर्चा सुरू आहे. यामध्ये:

राज हेमंत तापकीर, महेश कुलकर्णी, अमोल थोरात, राजू दुर्गे, सचिन लांडगे, कुणाल लांडगे, नरेश कदम, ज्योती मलकानी, सचिन काळभोर, जयनाथ काटे, कैलास प्रधान कुंजीर, मधुकर बच्चे, प्रभाकर वाघिरे, कामगार नेते बाबा कांबळे, राजेश पिल्ले, रोहिणी रासकर, आशा काळे, विना सोनलकर, श्रीकांत तापकीर, योगेश तळेकर, विकास बुर्डे, रवींद्र जांभुळकर, ओबीसी नेते भाऊशेठ रासकर आणि शंकर लोंढे यांचा समावेश आहे.

चिंचवडचे आमदार शंकर जगताप आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे हे आपल्या समर्थकांसाठी आग्रह धरणार की पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा विचार करणार, यावर भाजपच्या अंतर्गत राजकारणाची पुढील दिशा ठरणार आहे. महापौरपदाच्या घोषणेनंतर या पाच नावांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!