news
Home पिंपरी चिंचवड अनुभवाचा ‘विजय’! ज्येष्ठ नगरसेवक शीतल शिंदे यांची प्रबळ दावेदारी; चिंचवडमधील भाजपच्या विजयात सिंहाचा वाटा

अनुभवाचा ‘विजय’! ज्येष्ठ नगरसेवक शीतल शिंदे यांची प्रबळ दावेदारी; चिंचवडमधील भाजपच्या विजयात सिंहाचा वाटा

आमदार शंकर जगताप यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख; सलग ४ वेळा निवडून येण्याचा विक्रम आणि प्रशासनावरील पकड जमेची बाजू. (© २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवडच्या सत्तेत शीतल ऊर्फ विजय शिंदेंचा मोठा दावा; ‘त्या’ त्यागाचे फळ मिळणार का? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण


पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २० जानेवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर आता महत्त्वाची पदे कोणाकडे जाणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यामध्ये सर्वात प्रबळ नाव म्हणून ज्येष्ठ नगरसेवक शीतल ऊर्फ विजय शिंदे यांचे नाव समोर येत आहे. सलग तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलेले शिंदे हे महापालिकेतील भाजपच्या मुख्य दावेदारांपैकी एक मानले जात आहेत.

शीतल ऊर्फ विजय शिंदे यांनी या निवडणुकीत आपल्या प्रभागात वर्चस्व गाजवत विजय मिळवला आहे. सलग तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून येण्याचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सुरुवातीला निवडून आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकापैकी एक शितल शिंदे हे आहेत.महापालिकेतील प्रशासकीय कामकाजाची खडानखडा माहिती आणि प्रभागातील जनसंपर्क यामुळे त्यांचे नाव सध्या अग्रक्रमाने चर्चेत आहे.

राजकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१७ च्या निवडणुकीनंतर शीतल ऊर्फ विजय शिंदे यांची स्थायी समिती अध्यक्ष म्हणून वर्णी लागणे निश्चित मानले जात होते. मात्र, ऐनवेळी दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या शब्दाचा मान ठेवून शिंदे यांनी माघार घेतली होती. त्यांनी स्वतःचे अध्यक्षपद विलास मडगेरी यांना बहाल केले होते. पक्षासाठी आणि नेतृत्वासाठी केलेल्या या मोठ्या त्यागाची आठवण आता कार्यकर्त्यांकडून करून दिली जात आहे.

येत्या काळात भाजपमध्ये महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपदासाठी मोठ्या हालचाली सुरू होणार आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघातून येणारे शिंदे हे आमदार शंकर जगताप यांचे विश्वासू मानले जातात. २०१७ मध्ये दाखवलेला संयम आणि निष्ठा पाहता, यावेळी पक्ष त्यांना महत्त्वाच्या पदाची जबाबदारी देऊन न्याय देणार का? याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

शिंदे यांच्या दाव्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये मोठा उत्साह असून, शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी त्यांच्यासारख्या अनुभवी नेतृत्वाची गरज असल्याचे मत कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. येत्या आठवड्यात भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!